‘या’ 10 कंपन्यांच्या शेयरमध्ये LIC ने केली सर्वात जास्त गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय कंपन्यांच्या शेयरमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC) गुंतवणूक मूल्य 9.53 लाख कोटी रुपये आहे. मात्र, एलआयसीने शेयरमध्ये आपल्या एकुण निधीच्या केवळ केवळ 3.67 टक्के गुंतवणूक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर सूचीबद्ध असलेल्या 278 कंपन्यांमध्ये LIC ची गुंतवणूक एक टक्क्यांहून जास्त आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने या संदर्भात बातमी दिली आहे.

 

भारतीय कंपन्यांच्या शेयरमध्ये इन्श्युरन्स कंपन्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी 77 टक्के वाटा एलआयसीचा आहे. IDBI बँकेत (IDBI Bank) LIC ची सर्वाधिक 49.24 टक्के भागीदारी आहे.

 

एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance) मध्ये त्यांचा 45.24 टक्के वाटा आहे. एलआयसीने आयडीबीआयमधील (IDBI) सरकारचा मोठा हिस्सा विकत घेतला होता. एलआयसी हाऊसिंग फायनान्स ही गृहकर्ज (Home Loan) देणारी कंपनी आहे.

 

ITC मध्ये LIC ची भागीदारी 16.21 टक्के, हिंदुस्थान कॉपरमध्ये 14.22 टक्के, एनएमडीसीमध्ये 14.16 टक्के, एमटीएनएलमध्ये 13.12 टक्के, एल अँड टीमध्ये 12 टक्के आणि ऑइल इंडिया मध्ये 11.85 टक्के भागीदारी आहे.

मूल्याच्या बाबतीत, एलआयसीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) 95,274 कोटी रुपयांचे शेयर आहेत. एलआयसीची इन्फोसिस आणि टीसीएसमधील हिस्सेदारी 95,488 कोटी रुपयांची होती. ही आकडेवारी 31 डिसेंबर 2021 पर्यंतची आहे.

 

एलआयसीने डिसेंबर तिमाहीत पॉवर ग्रिड (Power Grid), ड्रेजिंग कॉर्पोरेशन (Dredging Corporation), कॉम्प्युटर सर्व्हिसेस (Computer Services), कोफोर्ज (Coforge), दीपक नायट्राइट (Deepak Nitrite) आणि जेएसडब्ल्यू स्टीलमधील (JSW Steel) आपला हिस्सा वाढवला आहे. यावेळी त्यांनी आयआरबी इन्फ्रा (IRB Infra), एबीबी इंडिया (ABB India), हिंदुस्तान मोटर्स (Hindustan Motors), स्टरलाइट टेक्नॉलॉजीज (Sterlite Technologies), एचएएल (HAL) आणि बॉम्बे डाईंगमधील (Bombay Dyeing) आपला हिस्सा कमी केला.

 

एलआयसी आपला आयपीओ आणणार आहे. ते IPO मधून 70,000 ते 1 लाख कोटी रुपये उभे करू शकतात. कंपनीचा आयपीओ पुढील महिन्यात येण्याची शक्यता आहे. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल. लिस्टिंगनंतर, एलआयसीचे बाजार भांडवल 13 ते 15 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान असेल.

 

अशा प्रकारे, देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत तिचा समावेश होईल.
सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस देशातील सर्वात मोठ्या लिस्टेड कंपन्या आहेत.

 

सध्या एलआयसीची मालकी सरकारकडे आहे. ही देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे.
सरकारला या कंपनीतील भागीदारी विकून सुमारे 70,000 ते एक लाख कोटी रुपये उभे करायचे आहेत.
यामुळे सरकारला चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल.

 

आयपीओनंतरही एलआयसी सरकारच्या मालकीची राहणार आहे.
कायद्यानुसार एलआयसीमध्ये सरकारची हिस्सेदारी 51 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही.
याशिवाय, सरकार 5 वर्षांमध्ये एलआयसीमधील 25 टक्क्यांहून जास्त भागीदारी विकू शकत नाही.

 

Web Title :- LIC | lic has invested most in these ten companies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya | किरीट सोमय्या संतापले, म्हणाले – ‘संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…’

 

Foods That Trigger Migraine | गोड पदार्थ आणि चॉकलेटने वाढते मायग्रेनची वेदना, ‘या’ 8 गोष्टींपासून रहा दूर, जाणून घ्या

 

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’