LIC च्या शेयरमध्ये का टिकत नाही तेजी, जाणून घ्या JP Morgan ने अनालिसिसमध्ये काय म्हटले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC | एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी टिकत नसल्याचे दिसत आहे. गुरुवारी पुन्हा या शेअरमध्ये घसरण पहायला मिळाली. 1.06 वाजता एलआयसीच्या शेअरचा भाव 1.13 टक्के घसरणीसह 660.70 रूपये होता. यापूर्वी आठवड्यात या शेअरमध्ये तेजी दिसली होती. मागील महिन्यात आलेल्या एलआयसीच्या आयपीओमध्ये मोठ्या संख्येने पॉलिसी होल्डर्ससह रिटेल गुंतवणुकदारांनी पैसे लावले होते. (LIC)

 

इन्व्हेस्टर बँकर जेपी मॉर्गन इंडियाचे म्हणणे आहे की, एलआयसीच्या शेअरसोबत मार्केटने चांगले वर्तन केले नाही. हा शेअर 20 जूनला घसरून 650 रूपयांवर आला होता. जेपी मॉर्गन यांनी एलआयसी शेअरच्या कामगिरीची चांगली अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी या शेअरसाठी 840 रूपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.

 

एलआयसी शेअर 17 मे रोजी लिस्टिंगनंतर 30 टक्केपेक्षा जास्त घसरला. जेपी मॉर्गनने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एलआयसीच्या नवीन बिझनेसची व्हॅल्यू त्यांच्या सध्याच्या पॉलिसीजच्या केवळ 1 टक्का आहे. ओल्ड पॉलिसीजसाठी 99 टक्के व्हॅल्यूसह आम्हाला त्याची प्राईस-टू-एम्बेडेड व्हॅल्यू 0.75 पट दिसते, जी खुप कमी आहे. जर ग्रोथ झीरो मानली तरी सुद्धा ती खुप कमी आहे. (LIC)

 

जेपी मॉर्गनने (JP Morgan) म्हटले की, अलिकडे एलआयसीच्या ग्रोथमध्ये तेजी आली आहे. या फायनान्शियल ईयर आणि पुढील दोन फायनान्शियल वर्षात वार्षिक आधारावर याची ग्रोथ सहा टक्के राहण्याचा अनुभव आहे. मागील चार महिन्यात एलआयसीच्या रिटेल प्रीमियमची ग्रोथ इंडस्ट्रीच्या तुलनेत जास्त राहीली आहे. ती 2019 च्या तुलनेत जास्त आहे.

 

ब्रोकरेज फर्म मॅक्युरीने एलआयसीच्या शेअरसाठी 1000 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. ही या शेअरच्या सध्याच्या प्राईसच्या 34 टक्के जास्त आहे. या ब्रोकरेज फर्मने न्यूट्रल रेटिंगसह मेमध्ये या शेअरचे कव्हरेजची सुरूवात केली होती. एमकाय ग्लोबल फायनान्स सर्व्हिसेसने सुद्धा या शेअरच्या प्राईसमध्ये मोठ्या घसरणीनंतर सुद्धा आपले रेटिंग न्यूट्रल कायम ठेवले आहे.

एलआयसीचा आयपीओ 3 मे रोजी ओपन झाला होता. तो 9 मे रोजी बंद झाला. सरकारने या कंपनीतील आपली 3.5 टक्के भागीदारी विकून 21000 कोटी रुपये मिळवले होते. अँकर इन्व्हेस्टर्सने एलआयसीचे 5.93 कोटी शेअर खरेदी केले होते. कंपनीने 949 रूपयांवर इन्व्हेस्टर्सला शेअर जारी केले होते. अँकर इन्व्हेस्टर्समध्ये जास्त देशांतर्गत फंड होते.

 

एलआयसीच्या आयपीओमध्ये देश आणि परेदशातील अँकर इन्व्हेस्टर्सने पैसे लावले होते.
यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ सिंगापुर, एसबीआय म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडचा समावेश होता.
परंतु, जास्त गुंतवणूक देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी केली होती.
या इश्यूमध्ये म्युच्युअल फंडच्या योजनांमध्ये 4000 कोटी रुपये किंमतीचे शेअर खरेदी केले होते.

 

या इश्यूमध्ये एलआयसीच्या पॉलिसी हॉल्डर्सने खुप रस दाखवला होता. पॉलिसी होल्डर्सचा कोटा सह पट सबस्क्राईम झाला होता.
याचे कारण डिस्काऊंट होते. कंपनीने आपल्या पॉलिसी होल्डर्सला प्रति शेअर 60 रूपयांचा डिस्काऊंट दिला होता.
रिटेल इन्व्हेस्टर्सला प्रति शेअर 45 रूपयांचे डिस्काऊंट मिळाले होते. या कारणामुळे रिटेल इव्हेस्टर्सने सुद्धा या इश्यूमध्ये चांगला रस दाखवला होता.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- LIC | lic shares do not sustain bullish trend jp morgan has said many things in its analysis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

 

Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द धूडकावून गुवाहाटी दाखल

 

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’