नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC | Covid-19 चा प्रभाव कमी झाल्याने आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीदरम्यान भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मृत्यू दाव्यांमध्ये जवळपास 20 टक्के घट नोंदली गेली आहे. मात्र, अधिकार्यांनी म्हटले की, दाव्यांची रक्कम 2020 च्या अगोदरच्या स्तरापेक्षा जास्त आहे. (LIC)
एलआयसी चेअरमन एम. आर. कुमार यांनी निकालानंतर अनालिस्टसोबतच्या चर्चेदरम्यान म्हटले की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या जून तिमाहीदरम्यान जवळपास 7,111 कोटी रूपयांच्या डेथ क्लेमची सेटलमेंट झाली होती, तर या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ते 5,743 कोटी रूपये होते. कुमार यांनी म्हटले की, अशाप्रकारे यात बर्यापैकी घसरण नोंदली गेली आणि कोविडचा प्रभाव कमी झाल्याने हे स्वाभाविक होते. (LIC)
मागील दोन वर्षात खुपच वाढले डेथ क्लेम
एलआयसीचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर दिनेश पंत यांनी म्हटले की, महामारीपूर्वी क्लेम रेट स्थिर होता. मात्र, कोविड-19 मुळे मागील दोन वर्षादरम्यान दाव्यांमध्ये खुपच जास्त वाढ झाली.
पंत म्हणाले, आता सध्या तिमाहीत म्हणजे 30 सप्टेंबर 2022 ला संपणार्या तिमाहीत आम्ही स्थिती सामान्य होण्याची अपेक्षा करत आहोत.
आतापर्यंत आकडे 2020 च्या अगोदरच्या स्तरावर पोहचलेले नाहीत.
आम्हाला वाटते की, यासाठी सध्या थोडा वेळ लागेल. सोबतच अशी काही प्रकरणे असतील ज्यांचा भार राहील.
परंतु त्यांचे रिपोर्टिंग झालेले नाही. लवकरच त्यांचेही रिपोर्टिंग होईल.
पुढील दोन वर्षात आणखी दिलासा
त्यांनी म्हटले की, आता असे मुद्दे सेटल होताना दिसत आहेत आणि कोविड प्रभाव कमी गंभीर झाला आहे.
आम्ही पुढील किमान दोन वर्षांसाठी आशावादी आहोत. स्थिती कोविडच्या अगोदरच्या स्तरावर पोहोचली पाहिजे.
आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या तिमाहीत एलआयसीचे नेट प्रॉफिट वाढून 682.88 कोटी रूपये झाले,
जे एक वर्षापूर्वी समान कालावधीत 2.94 कोटी रूपयांच्या स्तरावर होते.
Web Title :- LIC | lic witnessed decline of 20 per cent in death claims in q1 fy23 with covid19 impact seen to be ebbing
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Benefits Of Healthy Fats | डायबिटीजमध्ये लाभदायक आहे ऑलिव्ह ऑईल, जाणून घ्या इतर हेल्दी फॅट्सचे लाभ
Tulsi che Fayde | ‘या’ 5 आजारांच्या उपचारात अतिशय प्रभावी आहेत तुळशीची पाने, शरीर बनवतात निरोगी
Weight Loss Drink | ‘या’ 2 वस्तू मिसळून बनवा स्पेशल हेल्दी ड्रिंक; वजन कमी करणे होईल अतिशय सोपे