LIC ची खास पॉलिसी ! एकदाच पैसे गुंतवल्यावर मिळेल 65 हजार रुपये ‘हमखास’ पेन्शन ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लाईफ इन्श्युरंन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) देशातील मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ग्राहकांना विविध फायदे मिळतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या जीवन शांती स्कीमबाबत सांगत आहोत. या पॉलिसीची विशेषता म्हणजे यामध्ये मिळणारी पेन्शन. ही पॉलिसी ग्राहकांना पेन्शनद्वारे भविष्याची सुरक्षा प्रदान करते. 50 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीने 10,18,000 रुपये पॉलिसीमध्ये लावले तर त्यास ताबडतोब 65,600 वार्षिक पेन्शन मिळू लागते.

अशी आहे पॉलिसीची खासियत

एलआईसीने ही पॉलिसी समाजाच्या प्रत्येक वर्गाला लक्षात घेऊन तयार केली आहे. लाईफ इन्श्युरंन्स कॉर्पोरेशन ग्राहकांना अँडोमेंट, टर्म, लाईफ इन्श्युरंन्स आणि पेन्शन आदि पॉलिसी देते.

आम्ही तुम्हाला एलआयसीच्या पेन्शन पॉलिसीबाबत सांगत आहोत. एलआयसीच्या या पेन्शन पॉलिसीचे नाव ‘जीवन शांति’ आहे. यामध्ये एकरकमी रक्कम भरून तुम्ही आयुष्यभर पेन्शन मिळवू शकता.

ही पॉलिसी घेताना पॉलिसीधारकाकडे पेन्शनबाबत दोन पर्याय असतात. पहिला इमिजिएट दूसरा डेफ्फर्ड एन्युटी.

इमिजिएट म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर ताबडतोब पेन्शन मिळते, तर डेफ्फर्ड एन्युटीचा अर्थ आहे पॉलिसी घेतल्यानंतर काही काळाने (5, 10, 15, 20 वर्ष) पेन्शन मिळणे.

इमिजिएट एन्युटीमध्ये 7 पर्याय आहेत. तर डेफर्ड एन्युटीमध्ये दोन प्रकारचे पर्याय असतात ज्यामध्ये ‘सिंगल लाईफसाठी डेफर्ड एन्युटी’ आणि दुसरा ‘जॉईंट लाईफसाठी डेफर्ड एन्युटी’ आहे.

हा सिंगल प्रीमियम पेन्शन प्लान आहे, मात्र यामध्ये एकदाच प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये कमला पेन्शनची कोणतीही मर्यादा नाही. या प्लानमध्ये किमान 30 आणि कमाल 80 वर्षांची व्यक्ती गुंतवणूक करू शकते. या योजनेंतर्गत 1.5 लाखापासून कितीही गुंतवणूक करू शकता.

समजा एखाद्या 50 वर्षांची व्यक्तीने ऑपशन ‘अ’ म्हणजे प्रति महीना पेन्शनचा पर्याय निवडला, तर यासोबतच तो 10 लाख सम अ‍ॅश्युअर्ड पर्याय निवडतो. म्हणजे त्याला 10 लाख 18 हजार रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.

या गुंतवणूकीनंतर त्या व्यक्तीला प्रति महिना 5,617 रुपयांची पेन्शन मिळेल. ही पेन्शन जोपर्यंत पॉलिसीधारक जिवंत आहे, तोपर्यंत मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर ही पेन्शन बंद होईल.

या पॉलिसीत कर्जाची सुविधा सुद्धा आहे. यासोबतच पॉलिसी 3 महिन्यानंतर कधीही सरेंडर करता येऊ शकते. ती सुद्धा कोणतेही मेडिकल डॉक्यूमेंट जमा न करता.

असे घ्या समजून

50 वर्षांच्या व्यक्तीला 10,18,000 रुपये पॉलिसीमध्ये लावून ताबडतोब 65600 वार्षिक पेन्शन मिळेल. परंतु, डिफर्ड ऑपशन अंतर्गत त्यास किमान रक्कम मिळेल. :
1 वर्षानंतर – 69300 वार्षिक
5 वर्षानंतर – 91800 वार्षिक
10 वर्षानंतर – 128300 वार्षिक
15 वर्षानंतर – 169500 वार्षिक
20 वर्षानंतर – 192300 वार्षिक
महत्वाची गोष्ट ही आहे की, वरील दरांची जीवनभरासाठी गँरटी आहे.

हा प्लॅन खरेदी करण्याचे 5 फायदे :

* ही पॉलिसी शेयर बाजारशी लिंक नाही. एफडी दरांचाही हिच्यावर परिणाम होणार नाही. शेवटी तुम्हाला आयुष्यभर एक निश्चित रक्कम मिळत राहील.
* तुमचे वय जेवढे जास्त असेल, तुम्हाला तेवढी पेन्शन मिळेल. जर तुमचे आयुष्य कमी झाले तर हाय रिस्क कव्हरसह नॉमिनीला जास्त बोनस मिळेल. अशाप्रकारे या प्लानमध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

* जर तुम्ही या पॉलिसीमध्ये एकरकमी 5 लाख रूपये गुंतवणूक केली आहे तर तुम्हाला जीवनभर 9 हजार रुपये महिना पेन्शन मिळेल.

* या पॉलिसीत फ्री लुक पिरियड सुद्धा आहे. जर पॉलिसी धारक, पॉलिसीबाबत संतुष्ट नसेल तर तो डाक्यूमेंट्स मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत ती परत करू शकतो.

* ही पॉलिसी तुम्ही तुमचे आई-वडील किंवा बहिण-भाऊ यांच्याशी जॉइंटमध्ये घेऊ शकता.