LIC MCap | आता टॉप-10 कंपन्यांच्या यादीतून बाहेर फेकली गेली एलआयसी, इतके झाले मार्केट कॅप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC MCap | सरकारी विमा कंपनी एलआयसी (LIC) साठी शेअर बाजार (Share Market) चांगला ठरलेला नाही. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जेव्हा कंपनी शेअर बाजारात उतरली तेव्हा आयपीओ (LIC IPO) नंतर डिस्काउंटवर लिस्ट झाली. त्यानंतर तिच्या शेअर्सची किंमत सातत्याने खाली येत आहे. याचा परिणाम कंपनीच्या मार्केट कॅप (LIC MCap) वर झाला आहे. आता परिस्थिती अशी आहे की एलआयसी मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील 10 सर्वात मोठ्या लिस्टेड कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे.

 

या दोन कंपन्यांना मिळाले स्थान

एलआयसीला टॉप-10 कंपन्यांच्या यादीतून बाहेर काढण्यात बजाज फायनान्स (Bajaj Finance) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) कारण ठरले. 30 ऑगस्ट रोजी बाजार बंद झाल्यानंतर, बीएसईवर अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission MCAp) चे मार्केट कॅप 4.43 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे अदानी समूहाची ही कंपनी 9 व्या स्थानावर पोहोचली. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स (Bajaj Finance MCap) 4.42 लाख कोटीच्या बाजार भांडवलासह 10 व्या क्रमांकावर आहे. एलआयसी आता 4.26 लाख कोटी रुपयांच्या एमकॅपसह 11 व्या स्थानावर गेली आहे. (LIC MCap)

 

आतापर्यंत इतका घसरला एलआयसीचा स्टॉक

एलआयसीचा स्टॉक 17 मे 2022 रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. एलआयसीच्या आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राईस बँड (LIC IPO Price Band) निश्चित करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी, एलआयसीचा शेअर 13 टक्क्यांपर्यंत घसरला आणि शेवटी तो 8.62 टक्क्यांनी म्हणजेच 81.80 रुपयांनी घसरून 867.20 रुपयांवर स्थिरावला होता. 949 रुपयांच्या तुलनेत आयपीओच्या वरच्या बँडवर नजर टाकली तर आतापर्यंत या शेअरची किंमत जवळपास 29 टक्क्यांनी घसरली आहे.

जून तिमाहीत कंपनीला 682.9 कोटी रुपयांचा बंपर नफा झाला होता. मागील वर्षीच्या तिमाहीत म्हणजेच जून 2021 मधील 2.9 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यापेक्षा तो अनेक पटींनी जास्त आहे. या कालावधीत, कंपनीच्या निव्वळ प्रीमियममध्ये वार्षिक आधारावर 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, कंपनीची कामगिरी तिमाही दर तिमाही आधारावर खाली आली. एलआयसीचा विमा व्यवसाय प्रामुख्याने 13 लाख सेल्स एजंट्सद्वारे चालवला जातो.

 

या आहेत टॉप 10 कंपन्या

मार्केट कॅपनुसार सर्वात मोठ्या लिस्टेड कंपन्यांबद्दल बोलायचे तर, मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) 17.8 लाख कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएस (TCS) 11.75 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह दुसर्‍या क्रमांकावर आहे.
या दोघांशिवाय, इतर कोणत्याही कंपनीचे एमकॅप 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही.
यादीत तिसर्‍या क्रमांकावर एचडीएफसी बँक (HDFC Bank), चौथ्या स्थानावर इन्फोसिस (Infosys),
पाचव्या स्थानावर हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever),
सहाव्या स्थानावर आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), सातव्या स्थानावर एसबीआय (SBI) आणि आठव्या स्थानावर एचडीएफसी (HDFC) आहे.

 

Web Title :-  LIC MCap | life insurance corporation of india market capitalization lic mcap slips adani transmission bajaj finance

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा