LIC च्या या खास पॉलिसीमध्ये फक्त 28 रूपयांमध्ये मिळेल 2 लाखाचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एलआयसी (LIC) ची मायक्रो बचत विमा योजना लो इन्कम ग्रुपच्या लोकांसाठी खुप उपयोगी आहे. ज्या लोकांची कमाई कमी आहे, त्यांच्यासाठी एलआयसीचा मायक्रो इन्श्युरन्स प्लॅन खुप लाभदायक आहे. हा प्लॅन प्रोटेक्शन आणि सेव्हिंगची कॉम्बिनेशन आहे. हा प्लॅन आकस्मिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार देईल. सोबतच मॅच्युअर झाल्यानंतर एकरकमी रक्कम प्रदान करेल. या प्लॅनबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

(1) लोनची मिळेल सुविधा
LIC – मायक्रो बचत नावाच्या या रेग्युलर प्रीमियमच्या प्लॅनमध्ये अनेक प्रकारचे फिचर्स आहेत. या इन्श्युरन्स प्लॅनमध्ये 50 हजार रुपये ते 2 लाखांपर्यंत विमा मिळेल. हा नॉन लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन आहे. या प्लॅन अंतर्गत पॉलिसीमध्ये लॉयल्टीचा फायदा सुद्धा मिळेल. जर एखाद्याने 3 वर्षापर्यंत प्रीमियम दिला आहे, तर त्यास मायक्रो बचत प्लॅनमध्ये लोनची सुविधा सुद्धा मिळेल.

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

(2) कोण घेऊ शकतो प्लॅन ?
LIC – हा विमा केवळ 18 ते 55 वर्षापर्यंत वयाच्या लोकांना मिळेल. या अंतर्गत कोणत्याही मेडिकल तपासणीची गरज नाही. जर कुणी 3 वर्षापर्यंत नियमित प्रीमियम भरत असेल आणि त्यांनतर प्रीमियम भरू शकत नसेल तर त्यास 6 महिन्यापर्यंत विम्याची सुविधा जारी राहील. जर हा प्रीमियम पॉलिसी होल्डर 5 वर्षापर्यंत भरत असेल तर त्यास 2 वर्षांचे ऑटो कव्हर मिळेल. या प्लॅनचा क्रमांक 851 आहे.

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

 

(3) किती वर्षाची असेल पॉलिसी टर्म ?
मायक्रो बचत इन्श्युरन्स प्लॅनची पॉलिसी टर्म 10 ते 15 वर्षांची असेल. या प्लॅनमध्ये वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकता. यामध्ये तुम्हाला एलआयसीच्या अ‍ॅक्सीडेंटल रायडर जोडण्याची सुद्धा मिळेल. मात्र, यासाठी तुम्हाला वेगळा प्रीमियम द्यावा लागेल.

कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी ‘हे’ तीन डॉक्टर घेऊन आले आहेत ‘रामबाण’ 2-DG !

 

(4) रोज 28 रुपयात 2 लाखांचा इन्शुरन्स
या अंतर्गत 18 वर्षांच्या वयाची कुणीही व्यक्ती जर 15 वर्षांचा प्लॅन घेत असेल तर त्यास प्रति हजार 51.5 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. तर 25 वर्षांच्या व्यक्तीला याच कालावधीसाठी 51.60 रुपये आणि 35 वर्षांच्या व्यक्तीसाठी 52.20 रुपये प्रीमियम प्रति हजार रुपये द्यावा लागेल. 10 वर्षांच्या प्लॅनमध्ये प्रीमियम 85.45 ते 91.9 रुपये प्रति हजार रुपये असेल. प्रीमियममध्ये 2 टक्क्यांची सूट सुद्धा मिळेल.

या सोप्या घरगुती उपायांव्दारे दूर करा हिरड्यांतून येणारा रक्तस्त्राव; जाणून घ्या

 

जर खरेदी केल्यानंतर तुम्हाला हा इन्श्युरन्स पसंत नसेल तर तुम्ही 15 दिवसांच्या आत हा प्लॅन सरेंडर करू शकता. जर कुणी 35 वर्षांची व्यक्ती 1 लाख रुपयांची सम अश्योर्ड वाली 15 वर्षांची पॉलिसी घेत असेल तर त्याचा वार्षिक प्रीमियम 5116 रुपये येईल. चालू पॉलिसीमध्ये 70 टक्केपर्यंत रक्कमेचे लोन मिळेल.

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या

 

(5) हे आहे गणित
जर एखाद्या व्यक्तीने 35 वर्षांच्या वयात पुढील 15 वर्षांसाठी ही पॉलिसी घेत असेल तर त्यास वार्षिक 52.20 रुपये (1 हजार रुपये विमा राशीवर) प्रीमियम जमा करावा लागेल. अशाच प्रकारे जर कुणी 2 लाख रुपयांची विमा राशी घेतली तर तिला वार्षिक 52.20 बाय 100 बाय 2 म्हणजे 10,300 जमा करावे लागतील. म्हणजे रोज 28 रुपये आणि महिन्यात 840 रुपयांचा प्रीमियम जमा करावा लागेल.

दररोज 1 ग्लास दूध पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो? संशोधनावरील तज्ञांचे मत जाणून घ्या

 

(6) प्रीमियम भरताना सेक्शन 80सी अंतर्गत मिळेल सूट
या दरम्यान, लोनवर 10.42 टक्केच्या व्याजदराने व्याज द्यावे लागेल. प्रीमियम भरण्यासाठी 1 महिन्यापर्यंत सूट असेल. या पॉलिसीसाठी मॅच्युरिटीचे कमाल वय 70 वर्ष असेल. ही एक लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी आहे. यासाठी तुम्हाला प्रीमियम भरताना सेक्शन 80 सी अंतर्गत इन्कम टॅक्सची सूट मिळेल.

READ ALSO THIS :

 

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स