LIC Mobile Notification | एलआयसी पॉलिसीधारकांनी या पध्दतीनं अपडेट करावेत डिटेल्स, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LIC Mobile Notification | भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात Life Insurance Corporation हे आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळी योजना आणत असते. ग्राहकांच्या फायद्यासाठी त्या योजनेतून त्यांना लाभ मिळावा या हेतुमधून विमा कंपनी अनेक नव्या पाॅलिसी (Policy) लाॅन्च करीत असते. दरम्यान, पॉलिसी प्रीमियमची माहिती मोबाईलवर (LIC Mobile Notification) मिळण्यासाठी ग्राहकाचा मोबाईल नंबर तात्काळ अपडेट करावा लागेल. LIC त्यांच्या ग्राहकांना प्रीमियम आणि त्यासंबंधित सूचना मोबाइलवर नोटिफिकेशन अलर्टच्या माध्यमातून पाठवते. त्यामुळे या सुविधा जाणून घेण्यासाठी ग्राहकाने याबाबत सविस्तर पाहणे आवश्यक आहे.

दरम्यान, LIC कडून ही माहिती प्राप्त करण्यासाठी, ग्राहकाचे संपर्क तपशील LIC कडे नोंदणीकृत (Register your contact details) असणे आवश्यक आहे. ग्राहक काही सोप्या स्टेप्स फॉलो करून त्यांचा संपर्क क्रमांक ऑनलाइन नोंदवू शकतात आणि त्यांच्या मोबाईलवर (LIC Mobile Notification) सूचना अलर्ट मिळवू शकतात.

अशाप्रकारे अपडेट करा संपर्क तपशील –

– सगळ्यात आगोदर तुम्हाला LIC ची वेबसाइट www.licindia.in वर जावे लागेल

– त्यानंतर तुम्हाला पेजवर एक कस्टमर सर्व्हिसेसचा पर्याय दिसेल, त्यावर जाऊन स्क्रोल डाऊन करा

– याठिकाणी ‘अपडेट Your contact details ऑनलाइन’ वर क्लिक करा

– त्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल. तिथे ‘अपडेट युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स’वर क्लिक करा

– आता ओपन झालेल्या नवीन पेजवर तुमची माहिती प्रविष्ट करा

– आता तुमचा संपर्क तपशील तपासा आणि घोषणा बॉक्स तसंच सबमिटवर क्लिक करा.

– पॉलिसी नंबर/नंबर्स प्रविष्ट करा.

– आता ‘Validated Policy Details’ वर क्लिक करा आणि पॉलिसी क्रमांक प्रमाणित करा.

 

स्टेटस ऑनलाइन तपासण्यासाठी –

– तुम्हाला आधी https://www.licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

– स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल.

– नोंदणीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

– यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. एकदा नोंदणी केल्यानंतर, तुम्ही कधीही स्टेटस तपासू शकता.

– तुम्हाला काही पॉलिसीबाबत माहिती हवी असल्यास तुम्ही 022 6827 6827 वर देखील कॉल करू शकता.

– या व्यतिरिक्त, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP लिहून संदेश पाठवू शकता.

– यात मेसेज पाठवण्यासाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

 

Web Title : LIC Mobile Notification | LIC policyholders should update details in this manner, otherwise …

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार (व्हिडिओ)

Pune Crime | सोसायटीच्या CCTV कॅमेर्‍याचा ‘अ‍ॅगल’ महिलेच्या बेडरूमच्या खिडकीवर, खासगी कपड्यातील प्रायव्हेट चित्रीकरण पाहणार्‍या चेअरमन, सेक्रटरी, खजिनदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर