LIC Money Back Plan | केवळ 150 रुपयात घ्या LIC ची पॉलिसी ! मिळेल 19 लाखांचा फायदा; पाहिजे तेव्हा पैसे परत; जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LIC Money Back Plan | मुलांचे शिक्षण, विवाह आणि इतर खर्चासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची अशीही एक स्कीम आहे, जी मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. एलआयसीच्या या योजनेचे नाव ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लान’ (LIC New Children’s Money Back Plan) आहे.

जाणून घेवूयात या पॉलिसीची वैशिष्ट्य :

हा विमा घेण्याचे किमान वय 0 वर्ष आहे.

विमा घेण्याचे कमाल वय 12 वर्ष.

याची किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे.

कमाल विमा रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही.

प्रीमियम वेवर बेनिफिट रायडर ऑपशन सुद्धा उपलब्ध.

मॅच्युरिटीचा कालावधी :

एलआयसीच्या न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक प्लानचा एकुण कालावधी 25 वर्षाचा आहे.

मनी बॅक इन्स्टॉलमेंट :

या प्लान अंतर्गत एलआयसी मुलाच्या 18 वर्ष, 20 वर्ष आणि 22 वर्षाचा झाल्यानंतर बेसिक सम इन्श्युअर्डच्या 20-20 टक्के रक्कमेचे पेमेंट करते.

उर्वरित 40 टक्के रक्कमेचे पेमेंट :

पॉलिसी होल्डरला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पेमेंट केले जाईल. यासोबतच सर्व प्रकारच्या बाकी बोनसचे पैसे दिले जातील.

मॅच्युरिटी बेनिफिट :

पॉलिसी मॅच्योरिटीच्यावेळी (विमाधारकाचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास) पॉलिसीधारकाला विमा रक्कमेची उर्वरित 40 टक्के रक्कम बोनससह मिळेल.

डेथ बेनिफिट :

पॉलिसी कालावधी दरम्यान पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या स्थितीत विमा रक्कमेशिवाय साधारण बोनस आणि अंतिम बोनस दिला जाईल. डेथ बेनिफिट एकुण प्रीमियम पेमेंटच्या 105 टक्केपेक्षा कमी असणार नाही.

 

Web Title : LIC Money Back Plan | lic new children money back plan invest only 150 rs and return back 19 lakhs know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MLA | ज्येष्ठ BJP कार्यकर्त्याच्या घरी आमदाराची टर उडवणारी टिपणी; थेट चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांकडे तक्रार

Pune Crime | पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करुन लुटले

Khel Ratna Award |….म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; PM मोदींनी सांगितलं ‘हे’ कारण