LIC Mutual Fund मध्ये पैसे गुंतवणं आणखीच झाले सोपे, घरबसल्या eKYC करून गुंतवू शकता पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीएसईने आता एलआयसी म्युचुअल फंडसोबत भागीदारी केली आहे. ज्याद्वारे ते बाजारात अग्रगण्य एमएफ प्लॅटफॉर्म बीएसई स्टार एमएफवर केवायसी सेवा देऊ शकतील. एलआयसी म्युचुअल फंडने ही घोषणा करताना म्हटले की, आनंद वाटतो की, ईकेवायसी सेवा आता बीएसई स्टार एमएफ मंचावर सर्व सदस्यांसाठी उपलब्ध आहे.

डिजिटल केवायसी प्रक्रियेद्वारे सर्व बीएसई स्टार सदस्यांना कोरोनाच्या काळात मदत मिळेल. घरबसल्या केवायसी केल्याने त्यांना कुठेही जावे लागणार नाही. डिजिटल केवायसी करण्याची प्रोसेस खुपच सोपी आणि युजर फ्रेंडली बनवली आहे. या भागीदारीवर टिपण्णी करताना आणि बीएसईसाठी ईकेवायसी प्लेटफॉर्मला शक्ती प्रदान करताना दिनेश पांगटे (सीईओ, एलआयसी म्युचुअल फंड असेट मॅनेजमेंट लिमिटेड) यांनी म्हटले की, डिजिटल भविष्य आहे आणि विशेषकरून अशा महामारीच्या काळात, व्हर्चुअल काँटॅक्ट महत्वपूर्ण ठरतात.

लाँचबाबत टिप्पणी करताना एलआयसी म्युचुअल फंडचे सीएमओ आर. के. झा यांनी म्हटले की, एलआयसी एमएफचे ईकेवायसी डिजिटल होण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. ईकेवायसी म्युचुअल फंड उद्योगासाठी महत्वपूर्ण आहे तसेच संपूर्ण आर्थिक सेवा उद्योगासाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे. हे नव्या ग्राहकांना सरळ आणि समृद्ध अनुभव प्रदान करण्यास सक्षम असेल आणि अशाप्रकार पूर्णपणे आम्ही पेपरलेस टेकनिकवर काम सुरू करू.