LIC New Children Money Back Plan | आपल्या मुलासाठी LIC च्या ‘या’ प्लानमध्ये करा गुंतवणूक, 150 रुपयांच्या बचतीवर मिळतील 19 लाख रुपये; जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC New Children Money Back Plan | भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) लोकांसाठी अनेक योजना आणते. ज्यामध्ये गुंतवणूक करून चांगला लाभ मिळू शकतो. तसेच विम्यासह चांगला फंडही मिळतो. तुम्हाला तुमच्या मुलासाठी एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची असेल, ज्यामुळे त्याचे भवितव्य सुरक्षित होईल किंवा नोकरी मिळेपर्यंत त्याला अधिकचे पैसे मिळावेत, तर येथे न्यू चिल्ड्रेन मनी बॅक प्लॅन (LIC New Children Money Back Plan) आहे. यामध्ये दररोज 150 रुपयांची बचत केल्यास तुमचे मूल श्रीमंत होऊ शकते. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेवूयात…

 

न्यू चिल्ड्रेन मनी बॅक प्लॅन

तुम्हाला योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर उशीर करू नका. आयुर्विमा महामंडळाची न्यू चिल्ड्रेन मनी बॅक पॉलिसी 25 वर्षांसाठी घेतली जाते. यामध्ये, मॅच्युरिटी रक्कम हप्त्यात दिली जाते. तुमचे पहिल्यांदा मूल 18 वर्षांचे असताना, दुसर्‍यांदा 20 वर्षांचे झाल्यावर आणि तिसर्‍यांदा 22 वर्षांचे झाल्यावर रक्कम दिली जाते.

 

बोनसचाही लाभ मिळतो

या योजनेअंतर्गत, आयुर्विमाधारकाला विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम मनी बॅक टॅक्स म्हणून मिळते. यासोबतच मूल 25 वर्षांचे झाल्यावर त्याला संपूर्ण रक्कम दिली जाते. उर्वरित 40 टक्के रकमेसोबत बोनसही दिला जातो. म्हणजेच, जर एखाद्याने या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर जास्तीत जास्त रक्कम मिळू शकते.

 

LIC New Children Money Back Plan पॉलिसीची ठळक वैशिष्ट्ये

  •   पॉलिसी घेण्याची वयोमर्यादा शून्य ते 12 वर्षे आहे.
  •   60 टक्के रक्कम हप्त्यांमध्ये आणि 40 टक्के रक्कम मुदतपूर्तीच्या वेळी बोनससह दिली जाते.
  •   या अंतर्गत 1,00,000 रुपयांचा किमान विमा घेता येतो आणि कमाल मर्यादा नाही.
  •   जर हप्ते भरले नाहीत तर व्याजासह एकरकमी रक्कम दिली जाते.

 

किती रक्कम जमा करावे लागते

या पॉलिसी अंतर्गत, जर कोणी दररोज 150 रुपयांची बचत करत असेल, तर विम्याचा प्रीमियम वार्षिक 55,000 रुपये दिला जातो.
म्हणजेच 365 दिवसांनुसार तुम्हाला 25 वर्षांत एकूण 14 लाख रुपये जमा करावे लागतील.

तुम्ही 14 लाख रुपये जमा केल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला 19 लाख रुपये मिळतील.
जर तुम्हाला मध्येच पैसे घ्यायचे नसतील, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर बोनससह एकरकमी रक्कम दिली जाते.

 

Web Title :-  LIC New Children Money Back Plan | invest in this lic plan for your child you will get rs 19 lakh on saving rs 150 know how

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला मोक्काच्या गुन्ह्यात 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, चतुःश्रृंगी पोलिसांनी केली होती अटक

 

Tax Saving | 10 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 1 रुपयाचाही भरावा लागणार नाही टॅक्स, जाणून घ्या काय करावे

 

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर