LIC New Children’s Money Back Plan | LIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; तुमचं मूल होईल ‘लखपती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक पालक हा विचार करत असतात की आपल्या पाल्याच्या भविष्याची योग्य तजवीज कशी होईल. वेळच्यावेळी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी Education पैसे कसे उपलब्ध होतील या चिंतेत पालक असतात. परिणामी, पाल्याच्या जन्मापासूनच आई-वडील पैसे साठवायला सुरुवात करतात. परंतु, हे पैसे Money कोणत्या योजनांमध्ये गुंतवावे म्हणजे अधिक फायदा मिळेल (LIC New Children’s Money Back Plan) याविषयी पालकांना माहिती नसते.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

न्यू चिल्ड्रेन मनी बँक स्कीम (New Children’s Money Back Plan)
पालकांसाठी एलआयसीची न्यू चिल्ड्रेन मनी बँक स्कीम (New Children’s Money Back Plan) एक चांगला पर्याय ठरू शकते. आपल्याकडे एलआयसीची LIC गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी LIC च्या न्यू चिल्ड्रेन मनी बँक योजनेत गुंतवणूक Investment करणे फायदेशीर ठरू शकते. या योजनेत तुम्हाला प्रतिदिन १५० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या पद्धतीने गुंतवणूक केल्यास नोकरीला लागण्यापूर्वी तुमच्या पाल्याच्या खात्यात लाखभर रुपये जमा असतील.

या पॉलिसीची वैशिष्ट्ये काय ?
– मुलगा किंवा मुलगी १२ वर्षाची होईपर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणुकीला सुरुवात करु शकता.

यामध्ये किमान विमा राशी एक लाख रुपये इतकी आहे. त्यापुढे किती गुंतवणूक Investment करायची याची कोणतीही मर्यादा नाही.

मॅच्युरिटीची ६० टक्के रक्कम तीन टप्प्यात, तर ४० टक्के रक्कम योजनेचा कालावधी संपल्यानंतर दिली जाते.

तीन टप्प्यातील मनी बॅक सुविधा न घेतल्यास मुदत पूर्ण झाल्यानंतर एकत्रित रक्कम व्याजासह मिळते.

Gold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

१८, २० आणि २२ व्या वर्षी पैसे परत मिळणार
न्यू चिल्ड्रेन मनी बँक स्कीम ही २५ वर्षांसाठी आहे.
यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते.
यापैकी पहिला हप्ता पाल्य १८ वर्षांचा झाल्यावर, त्यानंतर २० व्या वर्षी दुसरा आणि मुलगा किंवा मुलगी २२ वर्षांची झाल्यावर तिसऱ्या हप्त्यातील रक्कम मिळते.
या तिन्ही हप्त्यांमध्ये मॅच्युरिटीची प्रत्येकी २० टक्के रक्कम अदा केली जाते.
तर तुमचा पाल्य २५ वर्षांचा झाल्यावर उर्वरित ४० टक्के पैसे आणि बोनस दिला जातो.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : lic new childrens money back plan for small childrens

हे देखील वाचा

Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना