LIC च्या ‘या’ स्कीममध्ये मुलांसाठी बचत करा फक्त 206 रूपयांची, 27 लाखाची होईल ‘व्यवस्था’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चांगले निर्णय घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. एलआयसीने देखील असाच एक निर्णय घेत मुलांच्या भविष्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. एलआयसीने ‘न्‍यू चि‍ल्‍ड्रंस मनी बँक प्लॅन’ नावाची एक योजना सुरु केली आहे. यामध्ये तुम्ही रोज 206 रुपयांची बचत करून 27 लाख रुपये जमवू शकता.

असे मिळणार 27 लाख रुपये
तुमच्या मुलाचे वय पाच वर्ष आहे आणि तुम्ही मुलासाठी हा प्लॅन घेता तर तुम्हाला वीस वर्षानंतर म्हणजेच तुमचा मुलगा पंचवीस वर्षाचा झाल्यावर पूर्ण कालावधीनंतर तुम्हाला 26 लाख 74 हजार रुपये मिळतील.

याबाबच्या काही महत्वाच्या गोष्टी
1) मुलाच्या जन्मापासून ही योजना सुरु करू शकता
2) विमा घेण्यासाठी मुलाचे जास्तीत जास्त वय १२ वर्ष असावे
3) कमीतकमी 1 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
4) जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणत्याच मर्यादा नाहीत.
5) प्रीमियम वेवर बेनिफिट राइडर- ऑप्शन उपलब्ध.

मॅच्योरिटी बेनिफिट
पॉलिसी मॅच्योरिटी वेळी पॉलिसीधारकाला मिळणारी रक्कम ही 40 % बोनस जोडूनच मिळणार आहे.

डेथ बेनिफिट
पॉलिसीच्या मुदतीमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, मूळ रकमेच्या अंतर्निहित साधा प्रत्यावर्ती बोनस आणि शेवटच्या अतिरिक्त बोनसची रक्कम दिली जाते. मृत्यू लाभ एकूण प्रीमियम पेमेंटच्या 105 टक्के पेक्षा कमी असू शकत नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/