LIC New Jeevan Anand | ‘एलआयसी’ची ‘ही’ पॉलिसी खुप कामाची ! विना प्रीमियम मिळते 10 लाखाचे कव्हर आणि दरवर्षी बोनस

नवी दिल्ली : LIC New Jeevan Anand | जीवनाचा काही भरवसा नसतो, आज जीवन आहे आणि उद्या असेल किंवा नसेल. अशावेळी कुटुंबाबाबत विचार करणे सर्वांची मोठी जबाबदारी असते. कुटुंबातील प्रमुखाच्या जाण्याने मुलांच्या समोर आर्थिक तंगी येऊ नये, यासाठी लोक जीवन विमा पॉलिसी काढतात. विम्याच्या बाबतीत लोक सर्वात जास्त विश्वास Life Insurance Corporation म्हणजे LIC वर ठेवतात. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्य न्यू जीवन आनंद पॉलिसी बाबत (LIC New Jeevan Anand) सांगणार आहोत, ज्यामधून तुम्ही तुमच्या कुटुंबाला कोणत्याही अडचणींपासून मुक्त करू शकता.

 

खुप कामाची आहे LIC New Jeevan Anand

ही पॉलिसी Whole Life Endowment plan आहे, जी बचतीसह सुरक्षा सुद्धा देते. या योजनेंतर्गत तुम्हाला बोनस सुद्धा मिळतो. या पॉलिसीची सर्वात विशेष बाब ही आहे की मॅच्युरिटीनंतर सुद्धा जमाकर्त्याचे जीवन सिक्युर राहते कारण त्याचे रिस्क कव्हर जारी राहते, तसेच एका ठराविक कालावधीनंतर त्यास कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नसते. यामध्ये सर्वात महत्वाची बाब ही आहे की, ही पॉलिसीधारकाच्या मृत्यूपर्यंत फ्री रिस्क कव्हर देते.

 

नॉमिनीला मिळतात 50 लाख रुपये

समजा तुमचे वय 25 वर्ष आहे, तुम्ही 25 वर्षासाठी एलआयसीच्या या पॉलिसीमधून 10 लाखाचे कव्हर खरेदी केले आहे. जेव्हा तुमचे वय 50 वर्षाचे होईल तेव्हा पॉलिसी मॅच्युअर होईल. यानंतर तुम्हाला कोणताही प्रीमियम भरायचा नाही, पॉलिसी तोपर्यंत चालू राहिल जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात.

 

म्हणजे 10 लाखाचे कव्हर तुम्हाला तोपर्यंत मिळत राहिल. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर 10 लाख रुपये त्याच्या नॉमिनीला मिळतात. जर पॉलिसी टर्मच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला नाही तर आपोआप 10 लाख रुपये मिळतील.

 

गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही

न्यू जीवन आनंद पॉलिसी (New Jeevan Anand Policy) ग्राहकांना बचतीची संधी देते,
शिवाय सुरक्षा सुद्धा उपलब्ध करून देते. या स्कीम अंतर्गत बोनस (Bonus) सुद्धा मिळतो.
किमान 1 लाख रुपयाचे सम अ‍ॅश्युअर्ड (Sum Assured) घेणे आवश्यक आहे.

 

सम अ‍ॅश्युअर्डची कमाल मर्यादा नाही. न्यू जीवन आनंद प्लानसाठी कालावधी (Policy Term) 15 ते 35 वर्ष आहे.
ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे ही पॉलिसी खरेदी करता येते.

 

रक्कमेवर लागत नाही कोणताही टॅक्स

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टचे कलम-80सी च्या अंतर्गत प्रीमियम पेमेंटसाठी टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो.
मॅच्युरिटी किंवा मृत्युच्या वेळी मिळणार्‍या रक्कमेवर सुद्धा कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही.

 

Web Title :- LIC New Jeevan Anand | lic new jeevan anand policy lic policy gives rs 10 lakh cover benefit very good return

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा