९० दिवसाच्या मुलापासुन ते ६५ वर्षापर्यंच्या सर्वांसाठीच LICची ‘ही’ खास पॉलिसी, जाणून घ्या ५ फायद्याच्या विशेष गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी एक अतिशय उत्तम योजना आणली आहे. या योजनेचे नाव नवजीवन असून यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत. या पॉलिसीमध्ये सेविंग आणि प्रोटेक्शन असे दोन्ही लाभ तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पॉलिसीचा हफ्ता तुम्हाला वर्षातून एकदा सुद्धा भरता येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला यासाठी महिन्याला पैसे भरण्याची गरज नाही. त्याचबरोबर ५ वर्षांपर्यंत तुम्ही या पॉलिसीचे हफ्ते भरू शकता. ९० दिवसांपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांसाठी हि पॉलिसी उपलब्ध आहे.

अशा प्रकारे मिळावा पॉलिसी

एलआयसीची नवजीवन पॉलिसी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध असून तुम्ही कुठूनही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर एलआयसी एजंट देखील हे प्लॅन विकू शकतात. यासाठी तुम्हाला एलआयसीच्या https://eterm.licindia.in/onlinePlansIndex/login.do या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

या पॉलिसीमध्ये तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपयांपर्यंतची पॉलिसी मिळणार आहे. यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही. एखाद्या व्यक्तीचे वय ४५ वर्षापॆक्षा जास्त असेल तर त्याला प्रीमियम मध्ये दोन पर्याय दिले जातील. या पॉलिसीमध्ये ऍक्सिडेंटल डेथ आणि डिसएबिलिटी राइडरचे देखील पर्याय उपलब्ध आहेत. या पॉलिसीची कालमर्यादा १० ते १८ वर्ष राहील. सिंगल प्रीमियम पॉलिसी तुम्ही वयाच्या ४४ व्या वर्षापर्यंत खरेदी करू शकता.

दरम्यान, या पॉलिसीवर तुम्हाला आयकरातून सूट देखील मिळणार आहे. आयकर नियम ८० क द्वारे तुम्हाला आयकरातून सूट मिळणार आहे. त्याचबरोबर या पॉलिसीवर तुम्ही कर्ज देखील काढू शकता.

आरोग्यविषयक वृत्त –