दररोज फक्त 22 रूपये बचत करून घ्या LIC ची ‘ही’ पॉलिसी, जास्तीच्या फायद्यासोबतच होतील ‘हे’ मोठे लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीवन अमर नावाने एलआयसीच्या सर्वात स्वस्त आणि किफायतशीर पॉलिसी लॉंच केली आहे. या पॉलिसीमध्ये 2 डेथ बेनिफिट्स पर्याय जे की, लेवल सम एश्योर्ड आणि इन्क्रीजिंग सम एश्योर्ड यापैकी कोणत्याही एक सुविधेचा लाभ घेऊ शकता. हा प्लॅन विक्रीसाठी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच उपलब्ध होईल. एजंटच्या माध्यमातूनच हा प्लॅन खरेदी केला जाऊ शकतो.

कशी आहे नेमकी जीवन अमर पॉलिसी
10 वर्ष ते 40 वर्षापर्यंतचा कालावधी
एलआयसीची जीवन अमर पॉलिसी 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांसाठी घेतली जाऊ शकते. या पॉलिसीअंतर्गत मॅक्सिमम एज मॅच्युरिटी 80 वर्षे आहे. जीवन अमर अंतर्गत पॉलिसीची मुदत 10 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंत असेल.

धूम्रपान न करणार्‍यांसाठी कमी प्रीमियम
त्याचप्रमाणे धूम्रपान करणार्‍या आणि धूम्रपान न करणार्‍यांच्या प्रीमियममध्येही फरक असेल. पुरुषांचे प्रीमियम महिलांपेक्षा जास्त असेल. धूम्रपान करणार्‍याला धूम्रपान न करणार्‍या व्यक्तीपेक्षा जास्त प्रीमियम भरावा लागेल.

महिलांना करावे लागतील कमी पैसे खर्च
नियमित प्रीमियम पर्यायांतर्गत कोणतेही सरेंडर मूल्य उपलब्ध होणार नाही परंतु हे सिंगल प्रीमियममध्ये उपलब्ध असेल. त्याचबरोबर मर्यादित प्रीमियम पर्यायामध्ये काही नियम व शर्ती जोडल्या जातील. पुरुष आणि स्त्रियांसाठी प्रीमियमची रक्कम वेगवेगळी असेल.

प्रीमियम भरण्यासाठी हे असतील पर्याय
प्रीमियम भरण्यासाठी या पॉलिसीमध्ये तीन पर्याय उपलब्ध असतील. ते पुढील प्रमाणे

सिंगल प्रीमियम
रेग्युलर प्रीमियम
लिमिटेड प्रीमियम, यामध्ये देखील दोन पर्याय उपलब्ध असतील.
१) इंग टर्म (PPT) – यामध्ये पॉलिसी कालावधी 5 वर्षांपेक्षा कमी असेल
२) 10 वर्षांपेक्षा कमी कालावधी
प्रीमियम भरण्याची जास्तीत जास्त वयोमर्यादा 70 वर्षांची असेल. रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम पर्यायानुसार कमीत कमी हफ्ता 3000 रुपये असेल. सिंगल प्रीमियम पर्यायानुसार कमीत कमी प्रीमियम हफ्ता हा 30,000 रुपये ठेवण्यात आलेला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/