LIC Pension Scheme : दरमहा मिळवा 10 हजार रूपयांपर्यंत ‘पेन्शन’, मुदतीनंतर व्याजासह एकरकमी ‘फायदा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   वृध्दापकाळात दैनंदिन खर्च चालवण्यासाठी पेंशन फारच आवश्यक असते. त्यामुळेच भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करणे ज्येष्ठासाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजना केंद्र सरकारची ही योजना असून एलआयसीकडून चालवली जाते. योजनेत 60 व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येईल. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 10 हजार रुपयांचे पेन्शन मिळवू शकता. तसेच 10 वर्षांपर्यत पॉलिसीधारकाचा मृत्यू न झाल्यास त्याला पेंशनबरोबर पर्चेस प्राईससुद्धा परत दिली जाते.

या योजनेनुसार एक व्यक्ती जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यतची गुंतवणूक करू शकतो. यात गुंतवणुकदाराला एकररकमी देखील गुंतवणूक करता येईल. यात पेन्शन हे मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक स्वरुपात घेता येते. तसेच या योजनेत मुदतीआधीच पैसे काढून घेण्याची सुविधा आहे. जर एखाद्या व्यक्तीला दरमहा 9,250 रुपये म्हणजेच जवळपास 10,000 हजाराचे पेन्शन हवे असल्यास 15 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. जर वार्षिक पेन्शन हवे असेल तर तुम्हाला 1, 11, 000 मिळतील. या योजनेत 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 3, 333 रुपये दरमहा आणि 41 हजार 500 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. जर तुम्ही 3 लाख रुपये भरलेत तर तुम्हाला दर महा 2, 000 रुपयांचे पेन्शन मिळणार आहे.

गुंतवणूक करण्याची प्रक्रिया

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला pmvvymain.do या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स, तसेच ज्या खात्यात तुम्हाला पेंशन येते त्या बॅंकखात्याचे झेरॉक्सची गरज पडणार आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे फायदे

1)   प्रधानमंत्री वय वंदना योजनेत तुम्हाला कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. अर्थात पॉलिसी घेतल्यानंतर 3 वर्षांनी ही सुविधा मिळते.

2)  या योजनेत प्राप्तिकर विभागाकडून करात सूट मिळते.

3)  या योजनेत तुम्हाला पेन्शन मिळते शिवाय तुम्ही गुंतवलेली सर्व रक्कम तुम्हाला परत मिळते.

4)  जर तुम्ही किंवा तुमचा लाईफ पार्टनर गंभीर आजाराला सामोरे जात असाल तर तुम्ही यातून पैसे काढू शकता. अशावेळेस तुम्हाला पर्चेस प्राईसचा फक्त 98 टक्के इतकी रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून भरावी लागेल.