LIC नं पुन्हा लॉन्च केली मोदी सरकारची स्कीम, 12000 पर्यंत मिळणार पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदन योजना (पीएमव्हीव्हीवाय) सुरू केली. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2020 रोजी संपली होती, परंतु भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ती पुन्हा एकदा सुरु केली आहे. आपण आजपासून म्हणजेच मंगळवारपासून या योजनेत सामील होऊ शकता. सुधारित प्रधानमंत्री वय वंदन योजनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. या योजनेच्या व्याज दर, गुंतवणूक आणि पेन्शनच्या रकमेमध्येही बदल झाला आहे. एलआयसी अंतर्गत या योजनेत निवृत्तीवेतन म्हणून सुमारे 12 हजार रुपये प्राप्त होत आहेत. त्याचबरोबर या योजनेची अंतिम मुदत मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जाणून घेऊया या योजनेसंदर्भात….

पेन्शन योजनेमुळे वयाच्या 60 व्या वर्षांनंतरच तुम्हाला लाभ मिळू शकेल. या योजनेअंतर्गत, दरमहा 12,000 रुपये पेन्शनसाठी सुमारे 15.66 लाख रुपये आणि किमान 1000 रुपये निवृत्तीवेतनासाठी 1.62 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर पेन्शनसाठी गुंतवणूकदारास निश्चित तारीख, बँक खाते व कालावधी निवडायचा आहे. म्हणजेच, जर आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पेन्शन पाहिजे असेल तर ही तारीख निवडली जावी. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना हवे असल्यास निवृत्तीवेतनाचा पर्यायदेखील निवडता येतो. म्हणजे तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन हवे असल्यास आपण हा पर्याय निवडू शकता. आपण मासिक पर्याय निवडल्यास, पेन्शन दरमहा बँक खात्यात येईल. मात्र तिमाही निवडीवर दर तीन महिन्यांनी एकत्र पेन्शन मिळते.

त्याचप्रमाणे सहामाही किंवा वार्षिक निवडीनंतर तुम्हाला अनुक्रमे 6 किंवा 12 महिन्यांनंतर एकत्र पेन्शन मिळेल. दरम्यान योजनेतील गुंतवणूकीच्या 1 वर्षानंतर निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता प्राप्त मिळतो. ही योजना चालविण्याचा एकाधिकार एलआयसीचीला आहे. हे एलआयसी वेबसाइटवरून ऑफलाइन तसेच ऑनलाईनही खरेदी करता येईल. या योजनेचा मुदतपूर्व कालावधी 10 वर्षे आहे. यामध्ये पहिल्या वर्षी 7.40 टक्के हमी परतावा देण्यात येईल.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपण 022-67819281 किंवा 022-67819290 वर कॉल करू शकता. या व्यतिरिक्त टोल फ्री क्रमांकावर 1800-227-717 आणि [email protected] या ईमेल आयडीच्या माध्यमातून योजनेचे फायदे जाणून घेऊ शकता. https://licindia.in/Products/Pradhan-Mantri-Jan-Dhan- Yojana या वेबसाइटला भेट देऊन माहिती देखील मिळवू शकता.