LIC Policy For Women | महिलांसाठी अवघ्या 29 रुपयामध्ये 4 लाख बचत, 30 लाखाचा मिळेल विमा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Policy For Women | आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. दरम्यान हीच विमा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नव्या योजना आणत असते. पण आता कंपनीने महिलांसाठी एक मस्त विमा योजना (LIC Policy For Women) आणली आहे. ही योजना अनेकांच्या रुढ झाली आहे. ‘आधार शिला’ (LIC Aadhaar Shila Yojana) असं या योजनेचं नाव आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) आहे. त्याच महिलांसाठी ही योजना आहे. ही योजना 1 फेब्रुवारी 2020 रोजी सुरु करण्यात आली आहे.

 

ही पॉलिसी बचतीचीही सुविधा देते. जर एखाद्या महिलेने या पॉलिसीमध्ये दररोज 29 रुपये गुंतवले तर तिला मॅच्युरिटीवर चार लाख रुपये मिळतील. या काळात या योजनेत कर्ज देखील घेता येते. दरम्यान, 8 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला ही पॉलिसी घेऊ शकते. ही पॉलिसी 10 वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते. अधिकाधिक मुदत 20 वर्षे आहे. मॅच्युरिटीवेळी महिलेचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. असं सांगण्यात आलं आहे. (LIC Policy For Women)

 

‘आधार शिला’ (LIC Aadhaar Shila Yojana) या योजनेअंतर्गत, किमान 75 हजार रुपयांचा विमा मिळू शकतो तर कमाल रक्कम 30 लाख रुपये आहे. यात पॉलिसीधारक अपघाताचा लाभ घेऊ शकतो. समजा एखादी महिला 20 वर्षांची असेल आणि पॉलिसीची मुदतही 20 वर्षांची असेल आणि तिने तीन लाख रुपयांचा विमा उतरवला असेल, तर तिला वार्षिक जवळपास 10,649 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. परंतु आगामी वर्षी हा प्रीमियम 10,868 रुपयांपर्यंत वाढेल.

दरम्यान, मॅच्युरिटी झाल्यावर तिला चार लाख रुपये मिळतील. 2 लाख विमा रक्कम आणि शिल्लक रक्कम ही लॉयल्टी बोनस असेल.
या प्लॅनमध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा केले जाऊ शकतात.
तुम्ही वेळेवर प्रीमियम भरण्यास विसरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.
पण, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरण्याची निव़ड केल्यास साधारण पंधरा दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे.

 

पॉलिसी सुरू झाल्यापासून पाच वर्षांच्या आत पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास, विम्याच्या रकमेइतकी रक्कम दिली जाईल.
पण, यानंतर मृत्यू झाल्यास वारसाला विमा रक्कम आणि लॉयल्टी बोनसही मिळणार आहे.
तसेच, मॅच्युरिटी झाल्यावर, तुम्ही पूर्ण पेमेंट एकाच वेळी अथवा हप्त्यांत मिळवू शकता.
सलग 2 वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते. तेव्हा 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळु शकतो.

 

Web Title :- LIC Policy For Women | special for women get rs 4 lakh savings rs 30 lakh insurance in lic policy aadhaar shila

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा