LIC मध्ये आडकतील तुमचे संपूर्ण पैसे, जर नाही केलं ‘हे’ महत्त्वाचं काम, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही भारतीय जीवन बीमा निगम (LIC) कडून पॉलिसी घेतलेली आहे तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. एलआयसीने पॉलिसीधारकांना सांगितले आहे की आपल्या पॉलिसीअंतर्गत क्लेम, कर्ज इत्यादी पेमेंट्सची वेळेवर सेटलमेंट हवी असल्यास आपल्या बँक खात्याला पॉलिसीशी लिंक करा. नाही तर तुमचे सर्व पैसे अडकू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या एलआयसी पॉलिसीला बँक खात्याला लिंक करा. पूर्वी एलआयसी चेक पाठवून पॉलिसीधारकास संपूर्ण पैसे देत असत, परंतु आता त्यांनी हे करणे बंद केले आहे. एलआयसी पॉलिसीशी संबंधित रक्कम पॉलिसीधारकाच्या बँक खात्यात दिली जाते.
बँक खाते जोडणे महत्वाचे
LIC ने आता पॉलिसी धारकांच्या अकाउंटमध्ये थेट पेमेंट करायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही आपल्या पॉलिसीला बँक खाते जोडलेले नाही तर लवकर जोडून घ्या.
बँक खाते जोडण्याची प्रक्रिया
LIC पॉलिसीला बँक खाते जोडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला आपल्या बँकेचा कॅन्सल चेक किंवा पासबुकची झेरॉक्स जवळच्या एलआयसी धारकाकडे जमा करावी लागेल. एलआयसी कार्यालयात तुम्हाला एनईएफटी मैंडेट फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मसह, आपण कॅन्सलेशन चेक किंवा बँक पासबुकची एक प्रत जोडा आणि ती सबमिट करा. एक आठवड्यानंतर आपली पॉलिसी बँक खात्याला जोडली जाईल. यानंतर, एलआयसीकडून मिळालेले कोणतेही पैसे थेट तुमच्या खात्यात येतील.
कोणताच शुल्क नाही
कोणताही अतिरिक्त शुल्क न देता तुम्ही अगदी सहजपणे ही प्रक्रिया पार करू शकता. विनामूल्य ई-सेवांसाठी एलआयसीच्या ग्राहक पोर्टलवर एलआयसीच्या वेबसाइटवर नोंदणी करू शकता.
आता लागणार नाहीत हे चार्जेस
क्रेडिट कार्डद्वारे एलआयसीला देण्यात आलेल्या सर्व पैशांवरचा सुविधा शुल्क रद्द केलेला आहे. ही शुल्क माफी 1 डिसेंबरपासून लागू करण्यात आलेली आहे. एलआयसीने म्हटले आहे की प्रीमियम नूतनीकरण, नवीन प्रीमियम किंवा पॉलिसीद्वारे घेतलेल्या कर्जावरील व्याज किंवा कर्जावर 1 डिसेंबरपासून कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा सुविधा शुल्क आकारले जाणार नाही.
Visit : policenama.com
- पायी वेगाने चालण्याचे ‘हे’ आहेत तब्बल ३४ फायदे, वाचून व्हाल थक्क !
युष्य लाभण्यासाठी नियमित खा ‘हे’ फळ ! जाणून घ्या ६ फायदे - मडक्यातील पाण्याचे ९ फायदे आणि फ्रिजच्या पाण्याचे ५ तोटे जाणून घ्या
- ‘सुपरफूड अॅवोकॅडो’! खाताना, खरेदी करताना, साठवताना ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- लठ्ठपणाच्या दुष्परिणामांचे ‘हे’ आहेत २ मुख्य प्रकार, जाणून घ्या
- तुम्ही लठ्ठ आहात का ? ‘या’ २ पद्धतीने ओळखा, नेहमी लक्षात ठेवा या ४ गोष्टी
- काविळ, दम्यावर कांदा गुणकारी ! ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे