‘लॅप्स’ झालीय विमा पॉलिसी तर ‘नो-टेन्शन’, आजपासून मिळतेय पुन्हा सुरू करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर तुम्हीही एलआयसी पॉलिसी घेतली असेल आणि कोणत्याही कारणास्तव ती लॅप्स झाली असेल तर काळजी करू नका. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ती पुनरुज्जीवन करण्याची उत्तम संधी देत आहे. एलआयसीने म्हटले आहे की 10 ऑगस्टपासून पॉलिसीधारकांना लॅप्स झालेली पॉलिसी पुनरुज्जीवन करण्याची संधी दिली जात आहे. एलआयसीची ही मोहीम 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर दरम्यान असेल.

लेट फी मध्ये 20% पर्यंत सूट

एलआयसीने सांगितले की या योजनेंतर्गत केवळ विशेष पात्रता असलेल्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते. प्रीमियम भरल्याच्या तारखेपासून 5 वर्षांच्या आतील पॉलिसीचे पुनरुज्जीवन करण्याची संधी यात असेल. यासाठी काही नियम व शर्ती देखील असतील. पॉलिसीधारकांना लेट फी वर 20 टक्के सूट मिळेल. 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या लेट फी साठी 25 टक्के सूट दिली जाईल. 3 लाखाहून अधिक लेट फी साठी 30 टक्के सूट दिली जाईल.

या मोहिमेमध्ये त्या पॉलिसींचे देखील पुनरुज्जीवन केले जाऊ शकते ज्या प्रीमियम पेमेंट टर्मच्या स्थितीत लॅप्स झाल्या आहेत, ना की पूर्ण पॉलिसी मुदतीत. एलआयसीच्या या मोहिमेचा फायदा अशा पॉलिसीधारकांना होईल जे एखाद्या कारणास्तव प्रीमियम भरण्यात अयशस्वी ठरले आणि त्यांची पॉलिसी लॅप्स झाली.

नवीन पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा जुन्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करणे चांगले

एलआयसीने म्हटले आहे की नवीन पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा जुन्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करणे चांगले आहे. यामुळे पॉलिसीचे विमा संरक्षण पुनर्संचयित केले जाते. पॉलिसीमध्ये सुधारणा केल्यास ग्राहकांना डेथ बेनिफिट्सही मिळतील. म्हणजेच पॉलिसीधारकाच्या अकस्मात मृत्यूवर नामनिर्देशित व्यक्तीला पैसे मिळतील. वास्तविक, प्रीमियम न भरल्यास पॉलिसी थांबते, त्यानंतर धारकाला पॉलिसीवर मिळालेला लाभ मिळत नाही. विशेष पुनरुज्जीवनात एखाद्या पॉलिसीला केवळ एकदाच पुन्हा सुरू केले जाऊ शकते. तथापि, यासाठी हे आवश्यक आहे की पॉलिसी 3 वर्षांपेक्षा जास्त काळ लॅप्स झालेली नसावी.