LIC Policy | या पॉलिसीत मिळेल किमान 22 लाखांचे संरक्षण, सोबतच अनेक लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation) आपल्या ग्राहकांच्या गरजांची विशेष काळजी घेते. त्यामुळे बदलत्या गरजांच्या आधारे वेळोवेळी नवीन पॉलिसी लाँच करत असते. एलआयसीने नुकतीच धनसंचय पॉलिसी (LIC Dhan Sanchay Policy) लाँच केली आहे. या पॉलिसीच्या गुणवत्तेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (LIC Policy)

 

LIC Dhan Sanchay ही एक नॉन लिंक्ड, गैर भागीदारी, वैयक्तिक, बचत, जीवन विमा योजना आहे जी संरक्षण तसेच बचत देते. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास ही योजना कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. ही पॉलिसी मुदतपूर्तीच्या तारखेपासून पेआउट कालावधी दरम्यान हमी उत्पन्न प्रदान करते.

 

वार्षिक प्रीमियम ही पॉलिसीधारकाने निवडलेल्या पर्यायावर अवलंबून एका वर्षात भरावी लागणारी प्रीमियम रक्कम असेल. टॅक्स रायडर प्रीमियम, अंडररायटिंग एक्स्ट्रा प्रीमियम आणि मॉडेल प्रीमियम (असल्यास) साठी स्वतंत्र लोडिंग असेल. यामध्ये सिंगल प्रीमियमचीही व्यवस्था आहे. (LIC Policy)

 

प्रीमियम नियमितपणे किंवा वार्षिक भरला जातो यावर अवलंबून ही पॉलिसी ग्राहकांना 4 पर्याय देते. जे अशा प्रकारे आहेत.

नियमित/मर्यादित प्रीमियम भरण्याच्या बाबतीत
* ऑपशन ए-लेव्हल इन्कम बेनिफिट

* ऑपशन बी – वाढत्या इन्कमचे बेनिफिट

 

सिंगल प्रीमियम पेमेंटच्या बाबतीत
* पर्याय सी – सिंगल प्रीमियम लेव्हल इन्कम बेनिफिट

* पर्याय डी – लेव्हल इन्कम बेनिफिटसह सिंगल प्रीमियमवर जास्त कव्हर

 

किती आहे किमान सम एश्युअर्ड
एलआयसी धन संजय प्लॅन अंतर्गत एकूण चार प्रकारचे प्लॅन सादर करण्यात आले आहेत. त्याच्या ए आणि बी प्लॅनतर्गत, 3,30,000 रुपयांचे किमान विमा संरक्षण दिले जाईल. तसेच, प्लॅन सी अंतर्गत 2,50,000 रुपयांचे किमान विमा संरक्षण दिले जाईल. तर प्लॅन डी मध्ये 22,00,000 रुपयांचे किमान विमा संरक्षण मिळेल. या प्लॅनसाठी कमाल प्रीमियम मर्यादा निश्चित केलेली नाही. या प्लॅनसाठी किमान वय 3 वर्षे आहे.

 

एलआयसीची धनसंचय योजना एजंटद्वारे ऑफलाइन खरेदी केली जाऊ शकते.
यासोबतच www.licindia.in या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
यासोबतच पॉइंट ऑफ सेल पर्सनल लाइफ इन्शुरन्स (POSP-LI) किंवा कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटरमधून खरेदी करता येईल.

 

Web Title :- LIC Policy | lic dhan sanchay policy provides minimum sum assured on death as much as rs 22 lakh know 4 options

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात 1 ऑगस्ट पासून रिक्षाची भाडेवाढ ! ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसणार

 

Katrina-Vicky Death Threat | कतरिना कैफ-विकी कौशल यांना ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

 

Pune News | तलावाच्या मधोमध गेल्यावर लागला दम, महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू