LIC Aadhaarshila Policy : रोज फक्त 29 रूपयांची बचत करा अन् भविष्यामध्ये लाखो रूपये रिटर्न मिळवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज पुढचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून काही गुंतवणूक करणे हे आता सर्वासाठी एक महत्वाची बाब झाली आहे. तसेच महिलांसाठी अशी गुंतवणूक करणे विशेष आवश्यकतेचे बनले आहे. त्यामुळे त्या निवळ आर्थिकदृष्ट्या सशक्त बनणार नाहीत तर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या पद्धतीने उचलता येणार आहेत. तर अशा महिलांसाठी आता LIC ची आधारशिला पॉलिसी (Cornerstone policy) हा उत्तम पर्याय ठरणार आहे.

या पॉलिसीमध्ये दररोज २९ रुपये जमा करून महिला लाखो रुपयांचा लाभ घेऊ शकतात. ही पॉलिसी नेमकी कशी आहे. त्यात कशाप्रकारे गुंतवणूक करता येते, ते जाणून घ्या.

नेमकं आधारशिला पॉलिसी काय आहे ?
जर एखाद्याने आधारशिला पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर यामध्ये त्यांना चांगल्या संरक्षणासह चांगल्या प्रकारे बचत करता येणार आहे. ८ ते ५५ या वयोगटातील महिला या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतील. पॉलिसी दरम्यान, जर गुंतवणुकदाराचा मृत्यू झाला तर तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकेल.

प्रीमियम किती पहा –
आधारशिला पॉलिसीचा लाभ घेतल्यावर त्याचा प्रीमियम महिलेचे वय आणि पॉलिसीच्या कालावधीवर अवलंबून असेल. जर कुणी वयाच्या ३१ व्या वर्षी २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ४.५ टक्के करासह पहिल्या वर्षीचा प्रीमियम १० हजार ९५९ रुपये एवढा भरावा लागेल. पहिल्या वर्षीच्या प्रीमियमनंतर ही रक्कम १० हजार ७२३ रुपये एवढी होईल. त्यामुळे दररोज किमान २९ रुपयांची बचत करावी लागेल. असे एकूण २ लाख १४ हजार ६९६ रुपये जमा होतील. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला ३.९७ लाख रुपये मिळतील. त्याशिवाय या पॉलिसीमधून ग्राहकाला त्याच्या मृत्यूनंतर त्याचा फायदाही मिळेल.

१५ दिवसात पोलिसी रद्द करू शकता –
LIC च्या या पॉलिसीमध्ये ग्राहकाला ही पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधाही मिळणार आहे. समजा काही कारणामुळे ग्राहकाला ही पॉलिसी बंद करायची असेल तर हा प्लॅन घेतल्यानंर १५ दिवसांत तुम्ही ही पॉलिसी रद्द करू शकता.