Advt.

LIC च्या पॉलिसीधारकांसाठी अलर्ट ! डिजिटल ‘ट्रांजेक्शन’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) 30 कोटीपेक्षा जास्त पॉलिसीधारकांना डिजिटल पेमेंट करतेवेळी अलर्ट जारी केला आहे. कोरोना काळात बहुतांश लोक आपल्या पॉलिसीचा प्रीमियम नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे भरत आहेत. परंतु, यामध्ये फसवणुकीचे प्रकार सुद्धा होत आहेत. यासाठी एलआयसीने पॉलिसीधारकांना सावध केले आहे. एलआयसीचे बाजरात 70 टक्के मार्केट शेयर आहे.

कॅशने भरू नका रक्कम
एलआयसीने पॉलिसीधारकांना म्हटले आहे की, जर ग्राहकांनी प्रीमियम भरण्यासाठी नेट बँकिंग किंवा फोन बँकिंगसाठी स्वताला रजिस्टर केले असेल तर त्यांनी शाखेत जाऊन कॅश काऊंटरवर पैसे भरू नयेत. कारण अनेकदा एकाच महिन्यासाठी दोन वेळा प्रीमियम भरल्याचे प्रकार समोर आले आहेत. कोरोना काळात शाखेत गर्दी करण्यास आवश्यकता नाही.

पॉलिसी रेकॉर्डमध्ये नोंदलेला असावा योग्य पत्ता
पॉलिसीच्या रिन्युअलच्या वेळी प्रीमियम रिसीट पोस्टाद्वारे त्या पत्त्यावर पाठवली जाते, जो पॉलिसीमध्ये नोंद असतो. यासाठी नेहमी पॉलिसी रेकॉर्डमध्ये योग्य पत्ता नोंदवा.

रिसीट मिळाली नाही तर हे करा
जर एखाद्या पोलिसीधारकाला रिन्युअलची प्रीमियम रिसीट मिळाली नाही, तर त्यास आपल्या शाखेकडून प्रीमियम भरणा केल्याचे सर्टिफिकेट मिळेल. परंतु काहीही करून डुप्लीकेट प्रीमियम रिसीट जारी केली जाणार नाही.

ऑनलाइन भरलेले पैसे पोहचण्यास होऊ शकतो उशीर
सध्या, एलआयसीने आपल्या डाटाबेस स्ट्रक्चरचे विकेंद्रीकरण केले आहे, ज्यामुळे ऑनलाइन भरलेले पैसे उशीरा अपडेट होऊ शकतात. यामुळे खात्यातून काढलेली रक्कमेची तारीख आणि पॉलिसीमध्ये पैसे मिळण्याची तारीख वेगवेगळी असू शकते, ज्यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही.

केवळ या बँकासोबत भागीदारी
ऑनलाइन पैसे भरण्यासाठी एलआयसीने निवडक खासगी बँकांशिवाय अनेक डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर्ससोबत भागीदारी केली आहे. यामध्ये HDFC Bank, ICICI Bank, www.billjunction.com, Timesofmoney.com आणि www.billdesk.com प्रमुख आहेत, जेथे प्रीमियमचा भरणा करता येतो.