LIC Q4 Results | एलआयसीच्या नफ्यात झाली घसरण, गुंतवणुकदारांना मिळेल इतका लाभांश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Q4 Results | देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीने प्रथमच निकाल जाहीर केला आहे. एलआयसीने आपल्या शेअरधारकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. (LIC Q4 Results)

 

LIC ने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, मार्च तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 17 टक्क्यांनी घसरून 2,409 कोटी रुपयांवर आला आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीचा एकत्रित नफा 2,917.33 कोटी रुपये होता.

 

प्रीमियम उत्पन्न वाढले
एकल आधारावर LIC चा निव्वळ नफा 18 टक्क्यांनी कमी झाला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत तो 2,372 कोटी रुपये होता. एकल आधारावर कंपनीचा निव्वळ नफा एका वर्षापूर्वी याच तिमाहीत रु. 2,893 कोटी होता.

 

आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत प्रीमियम उत्पन्न 18 टक्क्यांनी वाढून 1.44 लाख कोटी रुपये झाले आहे. वर्षभरापूर्वी याच काळात हे उत्पन्न 1.22 लाख कोटी रुपये होते. (LIC Q4 Results)

इतका मिळेल लाभांश
या विमा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 10 रुपये दर्शनी मूल्याने रु. 1.50 लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

 

आता बोर्डाच्या या निर्णयाला शेअरधारकांची मान्यता मिळणे बाकी आहे. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे आर्थिक निकाल आले आहेत.
सोमवारी कंपनीचा शेअर बीएसईवर 1.89 टक्क्यांनी वाढून 837.05 रुपयांवर बंद झाला.

 

LIC चा शेअर आतापर्यंतच्या आयपीओच्या इश्यू किंमतीपासून 15 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्याचे लिस्टिंग 17 मे रोजी झाले होते.
हा आयपीओ देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा इश्यू होता.
सरकारने या कंपनीतील 3.5 टक्के हिस्सा विकून सुमारे 21,000 कोटी रुपये उभे केले होते.

 

Web Title :- LIC Q4 Results | lic q4 results net profit drops 18 to rs 2372 cr maiden dividend of rs 150 announced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Char Dham Yatra New Rules | चारधाम यात्रेचे बदलले नियम, 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लागू झाली ‘ही’ अट

 

Dr. Neelam Gorhe | निलम गोऱ्हेंच्या कार्यालयात धमकीचे पत्र, जाणून घ्या कारण

 

Post Office FD | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त लाभ; जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल