LIC Recruitment 2021 | एलआयसीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; विमा सल्लागार पदासाठी मागवले अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LIC Recruitment 2021 | कोरोनामुळे अनेक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सध्या बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. सुशिक्षित, अनुभवी युवक नोकऱ्यांच्या शोधात असून त्यातच नुकतंच शिक्षण पूर्ण केलेले युवक-युवतीदेखील नोकरी शोधत आहे. त्यामुळे नोकरीसाठी जिकरीचे प्रयत्न करावे लागत आहे. मात्र, रोजगाराच्या नवनवीन संधी आर्थिक क्षेत्रात सातत्याने उपलब्ध होत असतात. कॉमर्स शाखेतून पदवी घेतलेल्या, तसंच आर्थिक क्षेत्राशी निगडित शिक्षण घेतलेल्या युवकांना या संधी मिळू शकतात. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने देखील पदवीधारकांसाठी नोकरीची (LIC Recruitment 2021) सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

 

एलआयसीने विमा सल्लागार (lic insurance advisor) अर्थात इन्शुरन्स अँडव्हायझरच्या १०० पदांच्या भरतीकरिता (LIC Recruitment 2021) अधिसूचना जारी केली आहे.
त्यामुळे संबंधित शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी ही उत्तम संधी ठरू शकते. या पदांसाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी.
या पदासाठी उमेदवारांनी नोंदणी करण्यापूर्वी जारी केलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असं आवाहन एलआयसीने केली आहे.
अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून त्याची अंतिम मुदतीबाबत मात्र कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
तसंच या पदांसाठी निवड झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना कामासाठी नवी दिल्ली येथे रुजू व्हावं लागणार आहे.
ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना ७ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ (life insurance corporation of india) हे देशातलं वैधानिक विमा आणि गुंतवणूक
महामंडळ असून त्याच्यावर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचं नियंत्रण आहे.
सुरक्षित आणि खात्रीशीर विमा संरक्षणासाठी आजही ग्राहक `एलआयसी`च्या विविध योजनांना प्राधान्य देताना दिसतात.
त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि एक चांगली संधी आहे.
मात्र , नोंदणीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसारच विमा सल्लागार पदासाठी अर्ज करावा.

 

Web Title : LIC Recruitment 2021 | life insurance corporation of india recruitment 2021 openings for graduate candidates know more details and how to apply lic insurance advisor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Satara Crime | साताऱ्यातील व्यावसायिकाला 30 लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बनं उडवून देण्याची परदेशातून धमकी

EPFO | बँक अकाऊंट आणि PF नंबरद्वारे जाणून घेवू शकता PPO नंबर; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SBI Credit Card | SBI च्या क्रेडिट कार्ड धारकांना दणका ! आता ‘हे’ ट्रान्झॅक्शन महागणार, जाणून घ्या