LIC Saral Pension योजनेत एकदाच गुंतवा पैसे आणि आयुष्यभर घरबसल्या घ्या पेन्शनचा लाभ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LIC Saral Pension | एलआयसीची एक अशी योजना आहे, ज्याअंतर्गत केवळ एकदाच प्रीमियमचे पैसे भरून तुम्ही आयुष्यभर पेन्शनचा योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत छोट्यापासून मोठ्या रक्कमेपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते, ज्या आधारावर रक्कम तुम्हाला दिली जाते. या योजनेचे नाव एलआयसी सरल पेन्शन (LIC Saral Pension) योजना आहे. तिला मध्यवर्ती वार्षिक योजना सुद्धा म्हटले जाते. या योजनेचा लाभ 40 वयापासून 80 वयापर्यंत लोक घेऊ शकतात.

तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल. पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे. ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळत राहील. यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे.

एलआयसी सरल पेन्शन (LIC Saral Pension) योजनेसाठी महत्वाच्या गोष्टी

विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याची पेन्शन सुरू होईल.

मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता.

ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते.

या योजनेत 12000 रुपये वर्षाचे किमान लावाले लागतील. यात कमाल मर्यादा नाही.

तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल.

शिवाय पॉलिसी सुरू झाल्याच्या 6 महिन्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा आहे.

 

या कागदपत्रांची आवश्यकता

पत्त्याचा दाखला, आधार कार्ड ओळखपत्र (वोटर कार्ड / पॅन कार्ड इत्यादी), उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, बँकेची माहिती, पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाइल नंबर

असा करू शकता अर्ज

– एलआयसीच्या वेबसाइटवर जा.

– येथे सरल पेन्शन योजनेवर जाऊन नवीन सरल पेन्शन योजनेसाठी अर्ज करा, वर क्लिक करा.

– अर्ज उघडल्यानंतर यामध्ये विचारलेली माहिती भरा आणि कागदपत्र दाखल करा.

– अर्ज जमा करण्यासाठी शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा.

 

Web Title : LIC Saral Pension | in saral pension scheme of lic invest money once and get benefit of pension sitting at home for life

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chitra Wagh | भाजपच्या चित्रा वाघ यांची ‘महाविकास’ सरकारवर घणाघाती टीका, म्हणाल्या – ‘कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट’

Pune Corporation | पुणे महापालिकेची शहर सुधारणा समिती झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’ ! नियमांची ‘ओढाताण’ करून बोलविलेल्या खास सभेत ‘विषयांना’ मंजुरी

Maharashtra Band | नाना पटोलेंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं….’