LIC Saral Pension Plan | एलआयसीचा नवीन प्लान ! एकदा प्रीमियम भरून दरमहिना मिळवा 12000 रुपये; सोबतच सहज मिळेल कर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  जर तुम्हाला चांगल्या भविष्यासाठी गुंतवणुक करायची (Investment Planning) असेल तर तुमच्यासाठी एक शानदार प्लान (LIC Saral Pension Plan) आला आहे. जर पेन्शन योजना (Pension scheme) घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Plan) निवडू शकता.

LIC च्या योजनेत तुम्हाला केवळ एकदा प्रीमियम द्यायचा आहे आणि त्यानंतर 60 वर्षानंतर दरमहिना 12000 रुपये पेन्शन मिळवू शकता.
या पेन्शनचे पैसे तुम्हाला आयुष्यभर मिळतील.अलिकडेच देशातील सर्वात मोठी इन्श्युरन्स कंपनी एलआयसीने LIC Saral Pension scheme लाँच केला आहे.
ही एक विना-लिंक्ड, एकल प्रीमियम, व्यक्तिगत तात्काळ वार्षिकी योजना आहे. हा प्लान पत्नीसोबत सुद्धा घेता येऊ शकतो.

या स्कीममध्ये पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर कोणत्याही वेळी कर्ज घेऊ शकता.
हा प्लान ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

असा खरेदी करा प्लान

LIC ची नवीन Saral Pension scheme तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन www.licindia.in च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता.
प्लानच्या अंतर्गत minimum Annuity 12,000 रुपये प्रति वर्ष आहे.किमान खरेदी मूल्य वार्षिकी मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणार्‍याच्या वयावर अवलंबून असेल.
यामध्ये कमाल खरेदी मूल्याच कोणतीही मर्यादा नाही. ही योजना 40 वर्ष ते 80 वर्षाच्या वयासाठी उपलब्ध आहे. (LIC Saral Pension Plan)

किती करावी लागेल गुंतवणूक?

या प्लॅन अंतर्गत जर तुम्हाला मंथली पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर किमान 1 हजार रुपये दर महिन्याला जमा करावे लागतील. त्याचा प्रमाणे तिमाही पेन्शनसाठी किमान एक महिन्यात 3 हजारची गुंतवणूक करावी लागेल.

 

मिळतील दोन पर्याय

LIC च्या या स्कीम अंतर्गत पॉलिसीधारकाकडे एकरक्कमी पैसे भरण्यावर दोन उपलब्ध पर्यायांपैकी एन्युटी निवडण्याचा पर्याय आहे.
पहिल्या ऑपशन अंतर्गत पॉलिसी होल्डरला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील आणि जर त्याचा मृत्यू झाला तर 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला दिली जाईल.

तर, दुसरा पर्याय पॉलिसी होल्डरला आयुष्यभर पेन्शन मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर स्पाउस म्हणजे पती आणि पत्नीला आयुष्यभर पेन्शन मिळेल.
लास्ट सर्व्हायव्हरच्या मृत्यूनंतर 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला परत दिली जाईल.

 

Web Title : LIC Saral Pension Plan | lic saral pension plan you can get lifetime 12k rupees monthly just one time premium know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

Anti Corruption Bureau Nagar | 40 हजाराची लाच घेणारे जातपडताळणी कार्यालयातील 2 एजंट अँटी करप्शनच्या जाळ्यात

Weight Loss Tips | वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स; जाणून घ्या