LIC Saral Pension Scheme | एलआईसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये दर महिना मिळेल 12,000 रुपयांची पेन्शन, भरावा लागेल एकदाच प्रीमियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Saral Pension Scheme | LIC ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. करोडो लोकांचा LIC वर विश्वास आहे. एलआयसी ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते जेणेकरुन लोक आपली आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेवून आवडीची पॉलिसी निवडू शकतात. यापैकी एक सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme) आहे. ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रीमियम योजना आहे. ज्यामध्ये पॉलिसीधारकांना फक्त एकदाच प्रीमियम भरल्यानंतर आजीवन पेन्शन मिळते.

 

ही पॉलिसी सिंगल लाईफ जीवन आणि जॉईंट लाईफ अशा दोन पर्यायांसह येते. या दोन उपलब्ध पर्यायांपैकी कोणीही निवडू शकतो.

 

सिंगल लाईफ ऑप्शन
पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे. म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळत राहील. यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

जॉईंट लाईफ ऑप्शन
दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे. यामध्ये पती किंवा पत्नी, जो जास्त काळ जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही जिवंत नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल. (LIC Saral Pension Scheme)

 

योजनेची वैशिष्टे

– या योजनेत पॉलिसी काढताच पेन्शन सुरू होईल.

– पॉलिसीधारकाला दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वर्षातून एकदा पेन्शन घेण्याचा पर्याय आहे.

– योजनेतील किमान वार्षिकी रु. 12,000 प्रतिवर्ष आहे.

– किमान खरेदी किंमत वार्षिक मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असेल.

– या प्लॅनमध्ये कोणतीही कमाल खरेदी किंमत मर्यादा नाही.

– मासिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी महिन्यात किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील.

– त्रैमासिक पेन्शनसाठी एका महिन्यात किमान ३ हजार गुंतवावे लागतील.

 

येथून खरेदी करा

पॉलिसी ऑफलाइन किंवा ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते.

पॉलिसी वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते आणि पॉलिसी घेण्यासाठी तुम्ही या लिंकद्वारे अधिक माहिती मिळवू शकता.

https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-Saral-Pension-PLan-No-862,-UIN-No-512N342V01

40 ते 80 वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात.

 

Web Title :- LIC Saral Pension Scheme | in this policy of lic pension of rs 12000 will be available every month premium will have to be paid once LIC Saral Pension Scheme

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा