LIC Saral Pension Scheme | एलआयसीनं लाँच केला नवीन प्लान ! एकदा प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवा 12000 रुपये, सोबतच घेऊ शकता कर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) 1 जुलै, 2021 नवीन योजनेची सुरूवात केली आहे. LIC ने Saral Pension scheme लाँच केली आहे. LIC Saral Pension scheme एक विना-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, व्यक्तिगत तत्काळ वार्षिकी योजना आहे. हा प्लान स्पाऊससोबत सुद्धा घेता येऊ शकतो. या स्कीममध्ये पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कोणत्याही वेळी कर्ज मिळू शकते. हा प्लान ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ही भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार एक मानक तत्काळ वार्षिकी योजना (Immediate Annuity plan) आहे, जी सर्व जीवन विमाकर्त्यांसाठी समान नियम आणि अटी प्रदान करते. जाणून घेवूयात या योजनेबाबत सर्वकाही…

असा खरेदी करा प्लान
LIC ची नवीन Saral Pension scheme तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन www.licindia.in च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. प्लानच्या अंतर्गत minimum Annuity 12,000 रुपये प्रति वर्ष आहे. किमान खरेदी मूल्य वार्षिकी मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणार्‍याच्या वयावर अवलंबून असेल. यामध्ये कमाल खरेदी मूल्याच कोणतीही मर्यादा नाही. ही योजना 40 वर्ष ते 80 वर्षाच्या वयासाठी उपलब्ध आहे.

किती करावी लागेल गुंतवणूक ?
या प्लॅन अंतर्गत जर तुम्हाला मंथली पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर किमान 1 हजार रुपये दर महिन्याला जमा करावे लागतील.
त्याचा प्रमाणे तिमाही पेन्शनसाठी किमान एक महिन्यात 3 हजारची गुंतवणूक करावी लागेल.

मिळतील दोन पर्याय

पर्याय पहिला
LIC च्या या स्कीम अंतर्गत पॉलिसीधारकाकडे एकरक्कमी पैसे भरण्यावर दोन उपलब्ध पर्यायांपैकी एन्युटी निवडण्याचा पर्याय आहे.
पहिल्या ऑपशन अंतर्गत पॉलिसी होल्डरला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील आणि जर त्याचा मृत्यू झाला तर 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला दिली जाईल.

पर्याय दुसरा
तर, दुसरा पर्याय पॉलिसी होल्डरला आयुष्यभर पेन्शन मिळेल.
त्याच्या मृत्यूनंतर स्पाउस म्हणजे पती आणि पत्नीला आयुष्यभर पेन्शन मिळेल.
लास्ट सर्व्हायव्हरच्या मृत्यूनंतर 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला परत दिली जाईल.

Web Titel : LIC Saral Pension Scheme lic introduced new saral pension scheme with effect from 1st july 2021 know about it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 2,000 रुपये; येथे चेक करा यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही 

Survey | 60% कर्मचार्‍यांना वाटते पगार थोडा कमी मिळाला तरी चालेल पण काम करण्याचे स्वातंत्र्य असावे : सर्वे 

Paytm Cash Earning | खुशखबर ! Paytm देणार 50 कोटी रुपयांचा ‘कॅशबॅक’, जाणून घ्या का घेतला गेला निर्णय आणि कुणाला मिळणार लाभ?