LIC Saral Pension Scheme | एका प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन ! जाणून घ्या योजनेचे पूर्ण कॅलक्युलेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Saral Pension Scheme | भारतीय आयुर्विमा महामंडळाने सिंगल प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन देणारी योजना सरल पेन्शन योजना सुरू केली आहे. जर तुम्हाला सुद्धा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. कारण येथे आम्ही सरल पेन्शन योजना सविस्तर सांगणार आहोत. (LIC Saral Pension Scheme)

 

या योजनेत सिंगल प्रीमियम दिल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर किती पेन्शन मिळेल. सोबतच या योजनेच्या इतर अनेक फायद्यांबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

सरल पेन्शन योजना IRDAI च्या नियमानुसार इमिजिएट एन्यूटी प्लान आहे. ज्यासाठी किमान वय 40 आणि कमाल वय 80 वर्ष असावे. यासोबतच पॉलिसी होल्डर्स भारतीय नागरिक असावा. भारतीय आयुर्विमा महामंडळानुसार, पॉलिसी होल्डर्स दोन ऑपशनपैकी कोणतीही एक एन्युटी निवडू शकता. यासोबत सरल पेन्शन योजनेत पॉलिसी सुरू झाल्यानंतर 6 महिन्यानंतर कर्ज सुद्धा घेता येऊ शकते. (LIC Saral Pension Scheme)

 

लाईफ एन्यूटी विथ रिटर्न ऑफ पर्चेस प्राईस –
या पर्यायानुसार पेन्शनची रक्कम एकाच व्यक्तीला प्रदान केली जाईल. पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर बेस प्राईस पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला दिले जातील.

जॉईंट लाईफ –
जॉईंट लाईफ पर्यायानुसार पती आणि पत्नी दोघे या योजनेत सहभागी असतील. पती किंवा पत्नी दोघांपैकी जो दिर्घकाळ जिंवत राहील त्यास पेन्शन मिळत राहील. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शनची पूर्ण रक्कम प्रदान केली जाईल. असेच पतीच्या मृत्यूच्या बाबतीत सुद्धा आहे. पेन्शनच्या रक्कमेत कोणतीही कपात केली जाणार नाही. पती आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला बेस प्राईस दिली जाईल.

 

कसा घ्यावा प्लानचा लाभ
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे हा प्लान खरेदी करूशकता.

ऑनलाईन http://www.licindia.in च्या वेबसाईटवरून खरेदी करूशकता.

प्लानमध्ये किमान एन्युटी 12,000 रुपये प्रति वर्ष आहे.

किमान खरेदी म्यूल्य वार्षिक मोड, निवडलेले ऑपशन आणि पॉलिसी घेणार्‍याच्या वयावर अवलंबून आहे.

या प्लानमध्ये कमाल खरेदी मूल्याची कोणतीही मर्यादा नाही.

ही योजना 40 वर्ष ते 80 वर्षाचे लोक खरेदी करूशकतात.

मंथली पेन्शनचा फायदा घेण्यासाठी किमान महिन्याला 1 हजार रुपये गुंतवणुक करावी लागेल.

तसेच तिमाही पेन्शनसाठी किमान एक महिन्यात 3 हजारची गुंतवणूक करावी लागेल.

 

Web Title :- LIC Saral Pension Scheme | lic saral pension scheme lifelong pension at one premium understand complete calculation of complete scheme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LIC Dhan Rekha Plan | ‘एलआयसी’नं आणला नवीन ‘धन रेखा प्लॅन’ ! जाणून घ्या या मनी बॅक योजनेचे वैशिष्ट्य

Harnaaz Sandhu | Miss Universe 2021 ठरली भारतीय माॅडेल ‘हरनाज संधू’, सोशल मीडियावर जोरदार ‘ट्रेंड’ होतोय ‘Congratulations India’

Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’