LIC Saral Pension Yojana | केवळ 1 वेळा प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळतील 12000 रुपये, LIC च्या ‘या’ प्लानमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Saral Pension Yojana | जर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी पेन्शन योजना घेण्याचा प्लान करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामांडळ तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लान घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहिल. या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) आहे.

एलआयसी पेन्शन योजना एक सिंगल प्रीमियम प्लान आहे. या योजनेची सुरूवात 1 जुलैपासून झाली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

सरल पेन्शन योजना घेण्यासाठी 2 पद्धती :
पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे.

सिंगल लाईफ :
पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे.
म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत राहील,
त्यास पेन्शन मिळत राहील. यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

 

जॉईंट लाईफ :

दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे. यामध्ये पती किंवा पत्नी, जो जास्त काळ जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही जिवंत नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल.

सरल पेंशन योजनेची वैशिष्ट्ये
विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याची पेन्शन सुरू होईल.

मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता.

ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते.

या योजनेत 12000 रुपये वर्षाचे किमान लावाले लागतील. यात कमाल मर्यादा नाही.

तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल.

शिवाय पॉलिसी सुरू झाल्याच्या 6 महिन्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा आहे.

Web Titel :- LIC Saral Pension Yojana | lic give rs 12000 per month in one time investment in this policy check all details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | प्रेमसंबंधातून दोन वर्षापुर्वी जन्मलं ‘बाळ’, 25 वर्षीय तरूणीने प्रियकरानं ‘बरेवाईट’ केल्याचं मुंढवा पोलिसांना सांगितलं

Call Blocking Android Apps | सातत्याने येणारे ‘स्पॅम कॉल्स’ अडथळा निर्माण करतात? मग ‘या’ 5 अ‍ॅप्समधून नंबर्स करा ब्लॉक, जाणून घ्या

Ration Card | नवीन शिधापत्रिकेसाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी हमीपत्रही ‘ग्राह्य’