LIC नं केलं पॉलिसीधारकांच्या पैशांबाबत मोठं विधान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावरवरून सध्या एलआयसीबद्दल नकारात्मक बातम्या पसरत आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांमध्ये असे म्हटले जात आहे की, एलआयसीची आर्थिक परिस्थिती खालावली असून पॉलिसीधारक संकटात सापडले आहेत. मात्र एलआयसीने या वृत्ताचे खंडन करत एक निवेदन जारी केले आहे. पॉलिसीधारकांचे पैसे सुरक्षित असून त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आवाहन एलआयसीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

LIC म्हटले आहे की, सोशल मीडियावर कंपनीबद्दल पसरवलेल्या गोष्टी निराधार आहेत. कंपनीवर कोणतेही आर्थिक संकट नाही आणि सर्व पॉलिसीधारकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

काय आहे व्हायरल मेसेज –

एक मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, त्यात असा दावा केला आहे की, एलआयसीची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि येथे गुंतवणूक करणार्‍या लोकांच्या पैशाला धोका आहे. यावर एलआयसीने त्वरित संदेश पाठवत स्पष्टीकरण दिले की कंपनीवर कोणतेही आर्थिक संकट नाही. एलआयसीची आर्थिक स्थिती पूर्णपणे मजबूत आहे आणि पॉलिसीधारकांमध्ये पसरलेला गोंधळ निराधार आहे आणि व्हायरल मेसेज खोट्या बातम्यांच्या आधारे पसरवण्यात आला आहे.

पॉलिसीधारकांना आवाहन –

एलआयसीने स्पष्टीकरण दिले की सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज कंपनीच्या प्रतिमेला प्रतिष्ठेला हानी पोहचवण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत. त्याचबरोबर हा मेसेज एलआयसीच्या पॉलिसीधारकांना घाबरायचा प्रयत्न करीत आहे, हा मेसेज पूर्णपणे तथ्यहीन आहे. मात्र त्यामुळे एलआयसीची प्रतिमा डागाळत आहे.

2018-19 मध्ये एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांना सर्वाधिक 50,000 कोटी रुपयांचा बोनस वितरित केला होता. ऑगस्टमध्ये कंपनीचा साठा 72.84% च्या तुलनेत 73.06% झाला आहे. कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांना अशा अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.

Visit : Policenama.com