LIC ची ‘ही’ स्कीम 31 मार्चनंतर बंद होणार, ‘पॉलिसी’धारकावर थेट ‘परिमाण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी वीमा कंपनी असलेल्या एलआयसीची खास पॉलिसी 31 मार्चनंतर बंद होणार आहे. एलआयसीची ही खास पॉलिसी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. एलआयसीने आपली खास योजना प्रधानमंत्री वय वंदना योजना (पेन्शन स्कीम) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चला ही योजना बंद होईल. 31 मार्च 2020 नंतर या योजनेत गुंवणूक करता येणार नाही. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना एक ठराविक रक्कम देण्यासाठी सुरू करण्यात आली होती, परंतु आता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, 31 मार्च 2020 नंतर तुम्ही पीएमव्हीव्हीवायमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 10 वर्षापर्यंत दर महिना 10,000 रुपये उत्पन्नाची खात्री मिळते.

विमाधारकांवर कोणता परिणाम होणार
ही योजना बंद झाल्याने ग्राहकांवर कोणता परिणाम होणार, यावर जाणकारांचे म्हणणे आहे की, जे अगोदरपासून या योजनत आहेत, त्यांच्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. 31 मार्चनंतर या योजनेत नवीन गुंतवणूक बंद होणार आहे. 1 एप्रिलपासून कुणीही या योजनेत सहभागी होऊ शकणार नाही. जुन्या ग्राहकांना या योजनेचा पूर्ण फायदा मिळत राहणार आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीची कालमर्यादा 4 मे 2017 ते 3 मे 2018 पर्यंत ठरवण्यात आली होती, परंतु नंतर ती वाढवून 31 मार्च 2020 करण्यात आली.

काय आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना
प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत देशातील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा पर्याय देण्यात आला आहे. ही योजना निवडल्यानंतर 10 वर्षांसाठी 8 टक्के वार्षिक गॅरेंटीसह रिटर्नची व्यवस्था करण्यात आली आहे. तर वार्षिक पेन्शन पर्याय निवडल्यास तुम्हाला 10 वर्षांसाठी 8.3% रिटर्न मिळतो. या योजनेअंतर्गत मिळणार्‍या रिटर्नवर जीएसटी लागत नाही. या योजनेत एकरकमी किमान 1.50 लाख आणि कमाल 15 लाख रुपये जमा करावे लागतात. ही योजना विशेषकरून 60 वर्षांच्या व्यक्ती आणि त्यापेक्षा ज्येष्ठांसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना किमान 1000 रुपये प्रति महिना आणि कमाल 10000 प्रति महिना मिळतात. तसेच जीएसटी द्यावा लागत नाही आणि टॅक्समध्ये सूट आहे.