LIC Stocks Performance | स्टॉकने गाठला ‘ऑल टाइम लो’, इश्यू प्राईसपासून सुमारे 16% घसरला शेअर; पुढे काय करावे गुंतवणुकदारांनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Stocks Performance | 3 जून 2022 च्या सत्रादरम्यान एलआयसी स्टॉकने बीएसईवर 801 रुपयांची सर्वकालीन नीचांकी पातळी गाठली आहे. स्टॉक त्याच्या इश्यू प्राईसवरून सुमारे 16 टक्क्यांनी घसरला आहे. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओची बाजारात कमकुवत लिस्टिंग झाली होती. लिस्टिंग गेनच्या आशेने पैसे लावणार्‍या गुंतवणूकदारांची यामुळे निराशा झाली आहे (LIC Stocks Performance).

 

हा स्टॉक 8-9 टक्के डिस्काउंटवर लिस्ट झाला होता. मात्र, एलआयसी ’लंबी रेस का घोडा’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत दीर्घकालीन विचार करायला हवा. त्याच वेळी ब्रोकरेज फर्म एमके (Emkay) ने एलआयसीवर कव्हरेची सुरूवात होल्ड रेटिंगसह केली आहे. ब्रोकरेज सांगतात की स्टॉकचे मूल्यांकन आकर्षक आहे. कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे.

 

एलआयसी : स्टॉकने गाठला आल टाइम लो
एलआयसी स्टॉकने 3 जून 2022 च्या सेशनमध्ये बीएसईपर 801.05 रुपयांचा ऑल टाइम लो गाठला आहे. 17 मे 2022 ला बीएसईवर स्टॉक 9 टक्के डिस्काउंटसह 867 रुपये आणि एनएसईवर 8 टक्के डिस्काउंटसह 872 रुपयांवर लिस्ट झाला. (LIC Stocks Performance)

 

या आयपीओच्या लिस्टिंगवर गुंतवणुकदारांचे लक्ष लागले होते. एलआयसी आयपीओची इश्यू प्राईस 949/शेयर होती, ज्यामध्ये रिटेल गुंतवणुकदारांना 45 रुपये आणि पॉलिसी होल्डर्सला 60 रुपयांचा डिस्काउंट मिळाला. अशाप्रकारे इश्यू प्राईसपासून स्टॉक सुमारे 16 टक्के कोसळला आहे.

एलआयसीवर Emkay ची होल्ड रेटिंग
ब्रोकरेज रिसर्च फर्म Emkay ने एलआयसीवर कव्हरेजची सुरुवात Hold रेटिंगसह केली आहे. टार्गेट प्राईस 875 रुपये प्रति शेयर ठेवली आहे, जी Jun’23E ची इम्बेडेड व्हॅल्यू (EV) च्या 0.9x वर आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, तीन फॅक्टरमुळे स्टॉकवर दृष्टी न्यूट्रल ठेवली आहे.

 

पहिला, EV च्या तुलनेत व्हॅल्यू ऑफ न्यू बिजनेस (VNB) लो आहे. दूसरा, प्रायव्हेट सेक्टर पीयर्सच्या तुलनेत एज्युअलाईज्ड प्रीमियम इक्विलंट (APE) ग्रोथ आणि मार्जिन मुल्यांकन कमजोर आहे. कारण एलआयसीचे कमिशन कास्ट आणि ऑपरेशनल खर्च जास्त आहे. तिसरा, ईव्हीबाबत अस्थिरता आहे, कारण, नॉन-पर असेट्सच्या सुमारे 35 टक्के इक्विटी आहे.

 

ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, एलआयसी इन्श्युरन्स सेक्टरमध्ये मार्केट लीडर आहे, तर व्हॅल्युएशन पियर्सच्या तुलनेत चांगले आहे. कंपनीच्या डॉमिनंट साईजमुळे ऑपरेटिंग आव्हाने लपली जातात. मात्र कंपनीसोबत अजूनही काही आव्हाने सुद्धा आहेत.

 

गुंतवणुकदारांना 1 लाख कोटीचा फटका!
ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, रिटेल APE आणि एकुण एपीएवर एलआयसीचा मार्केट हिस्सा FY22 मध्ये 37 टक्के आणि 42 टक्के होता. मात्र, एका दशकापूर्वी तो 63 टक्के आणि 65 टक्के होता.

 

तर 5 वर्षापूर्वी तो 62 टक्के आणि 51 टक्के होता. यावरून स्पष्ट होते की, कंपनीचा मार्केटमधील हिस्सा हळुहळु कमी झाला आहे. या स्पेसमध्ये प्रायव्हेट कंपन्यांचे मार्केट शेअर वाढत आहे.

 

एलआयसीच्या आयपीओमध्ये व्हॅल्युएश 6 लाख कोटी मुल्यांकन करण्यात आले होते, तर आता कंपनीचा मार्केट शेअर सुमारे 5.06 लाख कोटीवर आला आहे. म्हणजे गुंतवणुकदारांचे सुमारे 1 लाख कोटी बुडाले आहेत.

एलआयसी : काय म्हणतात एक्सपर्ट
स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे रिसर्च हेड संतोष मीना यांचे म्हणणे आहे की, एलआयसी आपल्या सेक्टरमधील मोठी कंपनी आहे.
कंपनीने अलिकडे निकाल जारी केला होता. Q4 2022 मध्ये कंपनीच्या नेट प्रीमियममध्ये (YoY) 18 टक्के वाढ झाली आहे.

 

इन्व्हेस्टमेंटद्वारे इन्कम जवळपास स्थिर राहिले आहे. FY22 चे नेट प्रॉफिट 40 टक्के वाढले होते.
अपेक्षा आहे की, मॅनेजमेंट VNB मार्जिन आणि EV वर जून 2022 नंतर रिपोर्टमध्ये क्लियरिटी देऊ शकते.

 

मात्र, मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की, पुढील 5 वर्षात मार्जिन इंडस्ट्रीच्या सरासरीवर पोहचू शकते.
लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये चांगले करेक्शन झाले आहे.
यामध्ये गुंतवणुकदारांना लाँग टर्मच्या दृष्टीने स्टॉक Accumulate करण्याचा सल्ला आहे.

 

LIC चे Q4 मध्ये प्रॉफिट घसरले
एलआयसीला मार्च 2022 तिमाहीत 2409 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीच्या तुलनेत 17.41 टक्के कमी आहे.
तर, संपूर्ण आर्थिक वर्षादरम्यान कंपनीचा नफा 4043.12 कोटी रुपये होता जो वार्षिक आधारावर 40 टक्के जास्त आहे.

 

मार्च 2022 ला समाप्त तिमाहीत एलआयसीचा एकुण रेव्हेन्यू 11.64 टक्के (YoY) वाढून 2,11,471 कोटी रुपये होता.
कंपनीने 1.50 रुपये प्रति शेयरच्या लाभांशाची घोषणा केली आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- LIC Stocks Performance | lic stocks touches all time low on bse while brokerage emkay initiate coverage with hold rating expert view with long term check target

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | जूनमध्ये वाढेल DA, महाराष्ट्र सरकारने केले कन्फर्म, पगारात होईल 40,000 रूपयांची वाढ

 

Ramdas Athavale | ‘…तर संभाजीराजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते’ – रामदास आठवले

 

EPFO Interest Rate | नोकरदारांना मोठा धक्का ! EPFO च्या व्याजदरात मोठी कपात