राँग साईडने गाडी चालवल्यास कायमस्वरूपी रद्द होणार लायसन्स

अहमदाबाद : वृत्तसंस्था – भारत हा देश वाहुतकीचे नियम पालन करण्याबाबत जरा मागेच आहे. किमान शहरात तरी लोक काही प्रमाणात नियमांचं पालन करतात परंतु ग्राणीण भागात मात्र  जाब विचारणारंच कोणी नसतं. त्यामुळे परिस्थिती जरा वेगळीच दिसते. परंतु आता गुजरातमधील अहमदाबाद पोलीसांनी आता याबाबत खूपच कडक नियम बनवला आहे की, हा नियम तोडताना एखादा व्यक्ती दहा वेळा विचार करेल. अहमदाबाद ट्राफिक पोलीसांनी असा नियम बनवला आहे की, जर जर दोन वेळा कोणी राँग साईडने गाडी चालवताना आढळून आलं तर सदर ड्रायव्हरला ब्लॅक लिस्ट समाविष्ट केले जाईल. यानंतर तो कायद्याने गाडी चालवू शकणार नाही.

पोलीसांनी काढलेल्या या नवीन नियमामुळे राँग साईडने ड्रायव्हींग करताना पकडले गेल्यास पहिल्यांदा FIR दाखल करण्यात येणार आहे. यानंतर त्या गाडीचे पेपर तेथील स्थानिक आरटीओ ऑफिसला पाठवण्यात येणार आहे. यानंतर सदर ड्रायव्हरचं लायसन्स हे 3 ते 6 महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात येणार आहे. यानंतरही जर सदर ड्रायव्हर पुन्हा राँग साईडने ड्रायव्हींग करताना पकडला गेला तर त्याचं लायसन्स कायमस्वरूपी रद्द केले जाणार आहे. इतकेच नाही तर आरटीओ कडून त्याला ब्लॅक लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी मागणी केली जाईल.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना अहमदाबाद जिल्ह्याचे ट्राफिक पोलीस कमीशनर संजय खरात म्हणाले की, “याआधी जर नियम तोडणारा व्यक्ती पाचव्या वेळेस नियम तोडताना पकडला गेला तर त्याचं लायसन्स रद्द केलं जात होतं. परंतु नवीन वाहतुक नियमानुसार नियम तोडताना दुसऱ्यांदा जरी पकडलं गेलं तरी लायसन्स रद्द करण्यची परवानगी पोलीसांना देऊ शकतात. “इतकेच नाही तर अहमदाबाद आरटीओने मंगळवारी 7 लोकांचे लायसन्स रद्द केले आहे आणि वाहतूक पोलीस अधिकच जोशात ही मोहीत चालवत आहे.अनेक लोक काहीही विचार न करताच अगदी सहजच वाहतूक  नियमांचं उल्लंघन करतात. वाहतूक नियमांविषयी लोकांनी गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. यासाठी अशाच कठोर नियमांची आवशकता आहे. अहमदाबाद पोलीसांची ही मोहीम नक्कीच कौतुकास्पद आहे.