LIC पॉलिसीधारकांसाठी मोठी बातमी ! एका फोन कॉलमुळं होऊ शकतं मोठं ‘नुकसान’, ‘असं’ टाळा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये आजही सरकारी कंपनी म्हणून एलआयसी वर लोक अधिक विश्वास ठेवतात आणि पॉलिसी काढतात. परंतु काही काळापासून एलआयसीच्या नावाने फसवणूकही सुरू झाली असल्याचे समोर आले आहे. म्हणूनच कंपनीने आपल्या वेबसाइटवर त्याबद्दल माहिती देऊन लोकांना सतर्क केले आहे. काही लोक चुकीच्या पॉलिसीबद्दल ग्राहकांना कॉल करुन माहिती देत आहेत. तसेच त्यांचे विम्याचे पैसे त्वरित मिळण्याच्या नावाखाली लाखो लोकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे याबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे.

(1) फोन बाबत सावधान रहा – जर कोणी तुम्हाला एलआयसीचा एजंट म्हणून किंवा IRDAI अधिकारी, ECI अधिकारी म्हणून फोन करत असेल तर तुम्ही याबाबत सावधान असले पाहिजे. कारण एलआयसी कोणत्याच एजंटला फोनवर पॉलिसीबाबतचे फायदे, नुकसानीची माहिती देण्यास सांगत नाही. एलआयसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कंपनी कोणाशीही फोन वरून कोणतीच माहिती शेअर करत नाही.

या गोष्टींची घ्या काळजी
– LIC बोनस बाबतची माहिती शेअर करत नाही.
– मिळालेली माहिती खरी आहे किंवा नाही यासाठी www.licindia.in वर तपासणी करा आणि अधिक
माहितीसाठी एलआयसीच्या कार्यालयाला भेट द्या.

(2) चुकूनही यामध्ये फसू नका
जर तुम्हाला फोन वरून कोणी तुमची पॉलिसी बदलली असल्याचे किंवा इतर गोष्टीबाबत काहीही सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी वेबसाईटवर नक्की तपासा. बहुतेक करून यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तींकडून अधिक पैशांची लालच दिली जाते. त्यामुळे जर कोणी अधिक बोनस किंवा इतर काही जास्त पैशांची माहिती देत असेल तर तुम्ही तुमच्या पॉलिसी विषयी कोणतीही माहिती त्यांना देऊ नका.

एलआयसी बाबतची माहिती तुम्ही https://www.licindia.in/getattachment/Customer-Services/Costumer-Education/Spurious-calls_161017.pdf.aspx या ठिकाणी तपासून पाहू शकता.

(3) अशा फोनची करा या ठिकाणी तक्रार –
जर काही फसवणुकीबाबत माहिती द्यायची असेल किंवा तक्रार करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशमध्ये जाऊन याबाबतची तक्रार देऊ शकता.

त्याचप्रमाणे तुम्ही फसवणूक करण्यासाठी आलेल्या फोनची तक्रार [email protected] या इमेलद्वारे सुद्धा करू शकता.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like