संसदेच्या बाहेर ७ वर्षीय चिमुरडीचे निदर्शन ; ‘या’ गंभीर समस्येवर ‘कायदा’ करण्याचे थेट मोदींना घातले साकडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पर्यावरण संरक्षण विषयी एका ७ वर्षीय मुलीने गंभीर चिंता व्यक्त करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अन्य सर्व खासदारांना हवामान बदलाविषयी कायदा बनविण्याची मागणी करत संसद भवनाबाहेर शांततापूर्ण निदर्शन केले. या मुलीने आपल्या हातात एक पोस्टर पकडले होते ज्यावर लिहिले होते, ‘ प्रिय मोदीजी आणि सर्व संसद सदस्यांनी हवामान बदलाविषयी कायदा पास करावा आणि आपले भविष्य वाचवावे.’

या छोट्याशा आणि निरागस मुलीची इतक्या गंभीर मुद्द्यावरील मागणी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अशा पद्धतीने संसदेबाहेर निदर्शन करून मागणी करण्याची या मुलीची ही पहिलीच वेळ नसून याआधीही तिने याच अधिवेशनात २२ जून रोजी हातात बॅनर घेऊन संसदेबाहेर निदर्शन केले होते. या मुलीचे नाव लिसीप्रिया कंगजुम असे आहे. तिने म्हटले कि समुद्रजलाची पातळी वेगाने वाढत असून पृथ्वीचे तापमान देखील त्याच वेगाने वाढत आहे, असे असताना सरकारने यावर लवकरात लवकर ठोस आणि कडक कायदा बनवायलाच हवा.

हवामान बदलाचा वातावरणावर मोठा परिणाम :

हवामान बदल हि एक अशी समस्या बनली आहे जिच्याशी फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग झुंज देत आहे. फक्त निसर्गच नाही तर दैनंदिन जीवनावरदेखील याचा मोठा प्रभाव पडत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हवामान बदलाचा मोठा प्रभाव मान्सूनवर वेगाने पडत आहे ज्यामुळे मान्सूनच्या आगमनास उशीर होत आहे. यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सध्याच्या घडीला पाहता तमिळनाडू, हैद्राबाद, झारखंड, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्र इत्यादी राज्यांशिवाय देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील पाण्याची कमतरता वारंवार भासत आहे.

या सर्व समस्यांचा विचार करता सरकारला यासंबंधी लवकरात लवकर दुरोगामी उपाययोजना कराव्या लागतील अन्यथा या समस्या गंभीर रूप धारण करतील ज्यांमुळे जगणे मुश्किल होईल. हवामान बदलाविषयी संयुक्त राष्ट्र संघटनेपासून ते संपूर्ण जगात गंभीर चर्चा होत आहेत. यावर कायमस्वरूपी, वैश्विक आणि शाश्वत असा तोडगा काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत.

 

सकाळचा चहा करतो ताणतणावापासून सुटका, आहेत विविध फायदे

मधुमेहा वर मिळवू शकता नियंत्रण, हे फार नाही अवघड

दिवसातील २४ तासांपैकी २३ तास तुमचेच, फक्त १ तास *शरीरा साठी द्या

नोकरी शिक्षणानंतर आता स्थानिक निवडणुकांत मराठा आरक्षण ?

दलित तरुणावर प्रेम करणाऱ्या आदिवासी युवतीला अमानुष मारहाण