लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मांची भारतीय सैन्याच्या पहिल्या महाधिवक्तापदी नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्यात आज एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. भारतीय सैन्यात प्रथमच महिला न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा यांची भारतीय लष्कराच्या न्यायाधीश महाधिवक्तापदी नेमणूक करण्यात आली आहे. ज्योती शर्मा पूर्व अफ्रिके तील देश सेशल्सच्या सरकारच्या सैन्यात कायदा तज्ञ म्हणून काम करतील.

अ‍ॅडव्होकेट जनरल कोण असतात

भारतीय लष्कराची न्यायाधीश अ‍ॅडव्होकेट जनरल ही एक स्वतंत्र शाखा आहे ज्यात कायदेशीरदृष्ट्या पात्र सैन्य अधिकारी असतात. भारतात न्यायाधीश महाधिवक्ता (जज अ‍ॅडव्होकेट जनरल ऑफिसर) हे पद सैन्याच्या मेजर जनरलला दिले जाते. तो सैन्याचा कायदेशीर व न्यायिक प्रमुख असतो. तो सैन्याच्या सर्व बाबींमध्ये कायदेशीर सहाय्य करतो.

Visit : Policenama.com