Life Certificate for Pensioners | शेवटचे काही दिवस बाकी, जर ‘हे’ काम नाही केले तर मिळणार नाही पेन्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मासिक पेन्शनचा लाभ नियमितपणे करण्यासाठी सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) सादर करावे लागले. पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Life Certificate for Pensioners) सादर करण्याची अंतिम तारीख या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 30 नोव्हेंबर आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अवघे दोन दिवस (Life Certificate for Pensioners) शिल्लक राहिले आहेत. जर हे प्रमाणपत्र दिले नाही तर पेन्शन मिळणार नाही. हे प्रमाणपत्र बँका आणि पोस्ट ऑफिस यांसारख्या पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे सादर करावे लागते.

 

पेन्शनधारकांची इच्छा असल्यास ते बँक आणि पोस्ट ऑफिसला वैयक्तिकरित्या किंवा ऑनलाइन भेट देऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate for Pensioners) सादर करु शकतात. या व्यतिरिक्त पेन्शनधारक त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र मॅन्युअली किंवा डिजिटल पद्धतीनं सबमिट करु शकतात. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पाच पर्याय आहेत.

 

फेस अॅपद्वारे सादर करा प्रमाणपत्र
सरकार पेन्शनधारकांना आधार डेटाबेसवर आधारित फेस अॅप तंत्रज्ञान प्रणाली वापरुन डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करात येते. यासाठी Google Play Store वर जाऊन AadhaarFaceID अॅप डाऊनलोड करा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही jeevanpramaan.gov.in वरुन फेस अॅप डाऊनलोड करु शकता. त्यानंतर तुमचा नवीन फोटो सबमिट करा आणि नंतर डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवा.

 

डोअर स्टेप बँकिंग
डोअर स्टेप बँकिंग अलायन्सद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करता येऊ शकते. यासाठी नाममात्र शुल्क भरावं लागतं.
त्यानंतर संबंधित अधिकारी पेन्शनधारकाच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करेल.
पब्लिक स्टेक्टरमधील बारा बँकासमवेत काही अन्य बँका देशभरात 100 प्रमुख शहरांमध्ये आपल्या ग्राहकांना ही सुविधा प्रदान करते.

पोस्टाच्या माध्यमातून
पोस्ट विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय पोस्टमन द्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी घरोघरी सेवा सुरु केली आहे.
यासाठी पेन्शनधारकाला Google Play Store वरुन Postinfo हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.

 

बँक अथा पोस्ट ऑफिस
पेन्शनधारक PDA समोर स्वत: उपस्थित राहून पेन्शन डिसबर्सिंग अथॉरिटी (PDA) बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र मिळवता येऊ शकते.

 

Web Title :- Life Certificate for Pensioners | only 3 days left pensioners sitting at home submit life certificate in this way

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Yami Gautam | यामीला बनायचे होते IAS पण वडिलांच्या ‘त्या’ मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

Pune NCP | रामदेव बाबांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची गुडलक चौकात निदर्शने

Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत