Life Certificate | UIDAI ने दूर केली पेन्शनर्सची सर्वात मोठी समस्या, घरबसल्या होईल Pension चे हे काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Life Certificate | ओमिक्रॉन व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीदरम्यान पेन्शनर्सची Life Certificate (हयातीचा दाखला) जमा करण्याची मोठी अडचण UIDAI ने दूर केली आहे. UIDAI ने पेन्शनर्ससाठी FACE AUTHENTICATION सर्व्हिस लाँच केली आहे. यासाठी कुणीही पेन्शनर घरबसल्या आपण जिवंत असल्याचा पुरावा देऊ शकतो. यासाठी एक मोबाईल अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. त्याचे नाव AadhaarFaceRd App आहे.

मोदी सरकारने हे पाऊल ईज ऑफ सबमिटींग लाईफ सर्टिफिकेट अभियानांतर्गत उचलले आहे. यामुळे आता पेन्शनला बँक किंवा ट्रेझरीच्या फेर्‍या मारण्याची असुविधा होऊ नये.

 

स्टेप बाय स्टेप समजून घ्या कसे होईल फेस स्कॅन

– AadhaarFaceRd App गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा.

आरडी सर्व्हिस इन्स्टॉल झाल्यानंतर ते सेटिंगमध्ये दिसेल.

हे फेस अ‍ॅप्लीकेशन https://jeevanpramaan.gov.in/package/download करू शकता.

अँड्रॉईड फेस अ‍ॅपसाठी क्लाएंट इन्स्टॉलेशन डॉक्युमेंटवर क्लिक करा.

आवश्यक माहिती प्रदान करा – मेल आयडीवर एक लिंक पाठवली जाईल – लिंकवर क्लिक करा – फाईल डाऊनलोड फोल्डरमध्ये डाऊनलोड होईल.

 

अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी फाईलवर क्लिक करा

अ‍ॅप उघडा – आवश्यक परवानगी द्या -यामुळे ऑपरेटर प्रमाणपत्रासाठी स्क्रीन उघडेल – आवश्यक माहिती द्या – सबमिट करा – ओटीपी नोंदवा – ऑपरेटरचा चेहरा स्कॅन होईल -योग्य असल्यास, पॉप-अप दिसेल ‘क्लाईंट नोंदणी यशस्वी‘.

लक्ष द्या

1. ऑपरेटर प्रमाणीकरण एकवेळची प्रक्रिया आहे.

2. पेन्शधारक ऑपरेटर सुद्धा असू शकतो.

3. ऑपरेटर प्रमाणीकरणानंतर, पेंशनधारक प्रमाणीकरणासाठी एक स्क्रीन उघडेल.

4. एक ऑपरेटर अनेक पेन्शनधारकांचे डीएलसी जनरेट करू शकतो.

 

पेन्शनधारक प्रमाणीकरण (Life Certificate)

आवश्यक माहिती भरा – सबमिट करा – ओटीपी नोंदवा – नंतर सबमिट करा.

स्क्रीनवर दाखवल्यानुसार, सर्व तपशील योग्यप्रकारे भरा, दोन्ही चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट करा.

(नोट :- चुकीच्या माहितीमुळे पेन्शन वितरण कार्यालयात डीएलसीचे अपडेशन होऊ शकत नाही)

चेकबॉक्सवर क्लिक करा आणि लाईव्ह फोटोग्राफसाठी स्कॅन करा.

या पॉप-अप विंडोमध्ये स्कॅन प्रक्रिया जारी ठेवण्यासाठी ‘होय‘ निवडा.

चेकबॉक्सवर क्लिक करा आणि पुढे जा.

फेस ऑथेंटिकेशन करताना आपला चेहरा सरळ ठेवा आणि स्क्रीनवर दाखवलेल्या निर्देशांचे पालन करा.

फेस स्कॅनिंगनंतर मोबाईल स्क्रीनवर प्रमाण आयडी आणि पीपीओ नंबरसह डीएलसी सबमिशन दिसेल.

जर काही क्वेरी असेल तर [email protected] वर मेल करा.

 

Web Title :- Life Certificate | life certificate news how to generate and submit life certificate through face recognition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PMSBY योजनेत अतिशय कमी प्रीमियममध्ये मिळतो अपघात कव्हरचा लाभ, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेचे फायदे आणि अर्जाची प्रक्रिया

Sunny Leone Viral Video | मध्यरात्री भररस्त्यावर लुंगी घालून नाचली सनी लियोनी, व्हिडिओ झाला व्हायरल..!

Bharati Singh | खुशखबर ! सर्वांना हसवणारी काॅमेडियन भारती सिंह देणार सर्वांना ‘गोड’ बातमी