Life Certificate | केवळ 13 शिल्लक ! पेन्शनर्सने लवकर जमा करावा आपला हयातीचा दाखला, अन्यथा होईल नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही पेन्शनर्ससाठी (Pensioners) लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) सर्वात आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. वेळेवर ते जमा न केल्यास पेन्शन अडकू शकते. पेन्शनर्सला आपली पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करावे लागते. या हयातीच्या दाखल्याचा अर्थ असतो की, तुम्ही जिवंत आहात आणि पेन्शनधारकाला पेन्शन सुरू ठेवावी.

 

पेन्शनर्सला पेन्शन मिळत राहण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत दरवर्षी आपला हयातीचा दाखला जमा करावा लागेल. यासाठी पेन्शनर्सकडे 13 दिवसांचा वेळ शिल्लक आहे. येथे तुम्हाला ती पद्धत सांगत आहोत जी तुमच्या सोयीसाठी बँका आणि पोस्ट ऑफिसने (Post Office) सुरू केली आहे. SBI ने अलिकडेच एक नवीन वेबसाईट एसबीआय पेन्शन सेवा (SBI Pension Seva) पेन्शनर्ससाठी सुरू केली आहे, ज्यामध्ये याच्याशी संबंधीत प्रत्येक माहिती आहे.

 

एसबीआय पेन्शन सेवेवर उपलब्ध सेवा

1) पेन्शनधारक एसबीआय पेन्शन सेवा पोर्टलच्या माध्यमातून आपली पेन्शन पावती/फॉर्म 16 डाऊनलोड करू शकता.

2) वरिष्ठ नागरिक पेन्शन व्यवहाराची सर्व माहिती मिळेल.

3) एरियर कॅलक्युलेशन शीट डाऊनलोड करू शकता.

4) गुंतवणूक संबंधी माहिती.

5) ग्राहक आपल्या हयातीचा दाखल्याचे स्टेटस पाहू शकता.

6) पेन्शधारक आपले पेन्शन प्रोफाईल सुद्धा सहज पाहू शकता.

 

एसबीआय पेन्शन सेवा वेबसाईटवर पेन्शनधारकांना मिळतात हे लाभ

– पेन्शनर्सला मोबाइलवर एसएमएस अलर्टद्वारे पेन्शन डिटेल्स पाठवल्या जातील.

– ब्रँचवर जीवन दाखल्याची सुविधा उपलब्ध असेल.

– पेन्शनर्स ईमेल किंवा पेन्शन पेईंग ब्रँचपासून पेन्शन स्लीपसुद्धा मिळवू शकतात.

– सोबतच SBI च्या कोणत्याही शाखेत लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करण्याची सुविधा मिळते.

 

SBI पेन्शन सेवा : तक्रार निवारण

वेबसाइट ऑपरेट करताना ज्येष्ठांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी एसबीआयने हेल्पलाइन नंबरसुद्धा जारी केला आहे. काही समस्या आल्यास एरर स्क्रीन शॉटसह [email protected] वर तक्रार ईमेल करू शकता. (Life Certificate)

 

एसएसएम सेवा आणि कस्टमर केयर नंबर

याशिवाय 8008202020 नंबरवर UNHAPPY टाईप करून एसएमएससुद्धा करू शकता. सोबतच बँकेने कस्टमर केयर नंबर 18004253800/1800112211 किंवा 08026599990 सुद्धा जारी केला आहे, ज्यावर कॉल करून समस्या सांगू शकता.

 

Web Title :- Life Certificate | life certificate only 13 days are left pensioners should submit life certificate soon SBI Pension Seva

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा