Homeताज्या बातम्याLife Certificate | पेन्शनर्स 'या' 5 पद्धतीने जमा करू शकतात लाईफ सर्टिफिकेट,...

Life Certificate | पेन्शनर्स ‘या’ 5 पद्धतीने जमा करू शकतात लाईफ सर्टिफिकेट, शिल्लक आहेत केवळ 6 दिवस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पेन्शनर्स (Pensioners) साठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही अजून पर्यंत लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) म्हणजे हयातीचा दाखला जमा केला नसेल तर ताबडतोब जमा करा, कारण आता केवळ 6 दिवस शिल्लक आहेत. 30 नोव्हेंबरपूर्वी आपला हयातीचा दाखला जमा करायचा आहे. जर तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा केले नाही तर तुमची पेन्शन अडकू शकते. तुम्ही या 5 पद्धतींचा वापर करून आपला हयातीचा दाखला जमा करू शकता.

 

1 जीवन प्रमाण पोर्टलवर जमा करू शकता लाईफ सर्टिफकेट

 

तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.
यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागेल. याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस पाहिजे.

 

2 घरी मिळणारी बँकिंग सर्व्हिस

 

देशभरात 12 सरकारी बँका अशा आहेत त्यांच्या सर्व्हिसेस अंतर्गत लाईफ सर्टिफिकेट जमा करता येते. या 12 बँकांत SBI, PNB, बँक ऑफ बडोदा,
बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, UCO बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

 

3 पोस्टमनला देऊ शकता लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate)

 

मागील वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये पोस्टमनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) जमा करण्याची डोअर स्टेप सर्व्हिस लाँच झाली होती.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पोस्टमन आणि ग्रामीण पोस्टमनद्वारे ही सुविधा दिली जाते.
मोबाइलद्वारे ही सुविधा मिळवण्यासाठी पेन्शनर्सला गुगल प्ले स्टोअरवरून Postinfo App इन्स्टॉल करावे लागते.

 

4 बँकेच्या शाखेत जाऊन भरू शकता लाईफ सर्टिफिकेट

 

तुमची पेन्शन येते त्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.
तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, परंतु तुम्हाला डोअरस्टेप बँकिंग सेवेमध्ये शुल्क भरावे लागेल.

 

5 पेन्शन ऑफिसमध्ये द्यावे लागेल लाईफ सर्टिफिकेट

 

तुम्ही लाईफ सर्टिफिकेट थेट कंद्रीय पेन्शन ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा जमा करू शकता.

 

Web Title : Life Certificate | life certificate pensioners can submit life certificate in these 5 ways check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रशासनानं सुरू केली ‘ही’ सुविधा

PM Kisan | खुशखबर ! 15 डिसेंबरला शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येतील 2,000 रुपये, ‘या’ यादीत तपासा तुमचे नाव आहे किंवा नाही?

PF Account e-Nomination | पीएम खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन करणे झाले अनिवार्य ! आता विमा आणि पेन्शनचा लाभ घेण्यासाठी येणार नाही अडचण 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News