Life Certificate | नियमीत पेन्शन मिळण्यासाठी ‘या’ तारखेपूर्वी जमा करा लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  Life Certificate | जर तुम्ही सुद्धा पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. नियमानुसार या वर्षी सर्व पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपले जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) म्हणजे हयातीचा दाखला जमा करावा लागेल. जर असे केले नाही तर त्यांची पेन्शन थांबवण्यात येईल. सर्व निवृत्त कर्मचार्‍यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना खुप महत्वाचा असतो. याच महिन्यांमध्ये पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. लाईफ सर्टिफिकेट जमा केल्यानंतर पेन्शन पुढे सुरू राहते.

 

कोण-कोणत्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करू शकता, ते जाणून घेवूयात…

 

पोर्टलवर जमा करू शकता

 

तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.
यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागेल. याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस पाहिजे.
यानंतर स्मार्टफोनद्वारे ईमेल आयडी आणि आणि अ‍ॅपमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र घरबसल्या जमा करू शकता.

 

घरबसल्या जमा करा लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate)

 

पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हटले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट कार्यालयाच्या डोअरस्टेप सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.

 

या बँका देत आहे सर्व्हिस

 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.

 

इंडिया पोस्टाने सुरू केली सर्व्हिस

 

इंडिया पोस्टने ट्विट करून माहिती दिली आहे की, सिनियर सिटिजन सहजपणे आपल्या परिसरातील पोस्टातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CAC) मधून जीवन प्रमाण सेवांचा लाभ घेऊ शकतात.

 

कुठे करू शकता अर्ज

 

अर्जासाठी मोबाइल नंबर 7738299899 वर एसएमएस पाठवून जवळच्या जीवन प्रमाण केंद्रावर अपडेट घेऊ शकता. एसएमएसमध्ये JPL < पिन कोड लिहावा लागेल.
यावर तुमच्या एरियाच्या जवळपासच्या केंद्राची यादी मिळेल.

 

Web Title : Life Certificate | life certificate submission last date 30 november how to submit it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Drug Case | वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला गोप्यस्फोट; जाणून घ्या पत्रात?

Crime News | बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराचा पुत्र अटकेत

Bank Holidays November 2021 | नोव्हेंबरमध्ये पूर्ण 17 दिवस बंद राहणार बँका! कामासाठी जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची यादी