Life Certificate | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! आता पेन्शन मिळवण्यासाठी केवळ तुमचा चेहरा उपयोगी येईल, कागदपत्रे जमा करण्याची नाही आवश्यकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Life Certificate | कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Minister of State for Labor Jitendra Singh) यांनी सोमवारी यूनिक फेस रेकग्नेशन टेक्नॉलॉजी (Unique Face Recognition Technology) लाँच केली. ही पेन्शन धारकां (Pension Holders) साठी लाईफ सर्टिफिकेटचा पुरावा (proof of life certificate) म्हणून काम करेल आणि निवृत, वृद्ध नागरिकांसाठी सहजता आणेल. सर्व पेन्शनधारकांना पेन्शन जारी ठेवण्यासाठी आपला हयातीचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) दरवर्षी जमा करावे लागते.

 

कामगार, जन तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने (Ministry of Labor, Public Grievances and Pensions) अगोदरच लाईफ सर्टिफिकेट डिजिटल प्रकारे देण्याची सुविधा लाँच केली आहे. सिंह यांनी म्हटले की, केंद्र सरकार पेन्शनधारकांच्या गरजा आणि त्यांच्यासाठी जीवन जगणे सोपे करण्यासाठी संवेदनशील आहे.

2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर, सरकारने पेंशनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करणे आणि लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सांगितले की, यूनिक फेस रेकग्नीशन टॅक्नॉलॉजीद्वारे पेन्शनधारकांना आणखी मदत होईल.

 

सरकारने यास म्हटले मोठा रिफॉर्म

केंद्रीय मंत्र्यांनी दावा केला आहे की, लाईफ सर्टिफिकेट देण्याचे ही फेस रेकग्नेशन टेक्नॉलॉजी ऐतिहासिक सुधारणा आहे.
यातून केंद्र सरकारच्या (Modi Government) 68 लाख पेन्शनधारकांचे जीवन सोपे होईल,
शिवाय ईपीएफओ आणि राज्य सरकारांना सुद्धा मदत मिळेल. (Life Certificate)

 

सिंह यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत UIDAI (यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ला सुद्धा ही टेक्नॉलॉजी तयार करणे आणि डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेल्फेयर (DoPPW) चा असा उपक्रम शक्य केल्याने धन्यवाद दिले.

 

Web Title :- Life Certificate | Modi government launches face recognition technology for pensioners

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

PM Kisan | खुशखबर ! 15 डिसेंबरला ‘त्या’ सर्व शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, असे चेक करा स्टेटस

JanDhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर ‘या’ पध्दतीनं तपासा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

Jica Project PMC | डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ‘जायका’ नदी सुधार प्रकल्पाला मान्यता ! पहिल्या आठवड्यात निविदा मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविणार