ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

Life Certificate | पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’; जाणून घ्या शेवटची तारीख आणि प्रोसेस?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Life Certificate | जर तुम्ही सुद्धा पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नियमानुसार यावर्षी सुद्धा पेन्शनधारकांना (pensioners) 30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करावे लागेल. जर असे केले नाही, तर त्यांची पेन्शन थांबवली जाईल.

 

सर्व निवृत्त कर्मचार्‍यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना खुप महत्वाचा असतो.
याच महिन्यांमध्ये पेन्शनर्सला लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते.
Life Certificate जमा केल्यानंतर तुमची पेन्शन सुरू राहील. कोणत्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता ते जाणून घेवूयात…

 

पोर्टलवर जमा करू शकता

 

तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागेल.
याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस पाहिजे.
यानंतर स्मार्टफोनद्वारे ईमेल आयडी आणि आणि अ‍ॅपमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) घरबसल्या जमा करू शकता.

 

घरबसल्या जमा करा लाईफ सर्टिफिकेट

 

पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हटले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट कार्यालयाच्या डोअरस्टेप सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.

 

या बँका देत आहेत सर्व्हिस

 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.

 

तुम्ही वेबसाइट (doorstepbanks.com, www.dsb.imfast.co.in/doorstep/login), किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, किंवा टोल-फ्री नंबर (18001213721 किंवा 18001037188) वर कॉल करून बँकेची डोअरस्टेप सेवा बुक करू शकता.

 

इंडिया पोस्टने सुरू केली सर्व्हिस

 

इंडिया पोस्टने ट्विट करून माहिती दिली आहे की, सिनियर सिटिजन सहजपणे आपल्या परिसरातील पोस्टातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CAC) मधून जीवन प्रमाण सेवांचा लाभ घेऊ शकतात.
विभागाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, भारत सरकारला पेन्शनधारकांच्या योजनेसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवण्याच्या समस्येवर तोडगा काढायचा आहे.
जेणेकरून, प्रमाणपत्र सहज मिळवता येईल.

 

कुठे करू शकता अर्ज

 

अर्जासाठी मोबाइल नंबर 7738299899 वर एसएमएस पाठवून जवळच्या जीवन प्रमाण केंद्रावर अपडेट घेऊ शकता.
एसएमएसमध्ये JPL < पिन कोड लिहावा लागेल. यावर तुमच्या एरियाच्या जवळपासच्या केंद्राची यादी मिळेल.

 

Web Title : Life Certificate | pension to stop if you do not submit life certificate soon check process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


Pune Crime | पुण्यातील सिंहगड रोडवर चौथ्या मजल्यावरुन उडी मारून 26 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रचंड खळबळ


Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक (व्हिडिओ)


Sanjay Raut | संजय राऊतांचे सूचक विधान, म्हणाले – ‘एकतर राज्यपाल राहतील नाही तर…’ 

Back to top button