Life Certificate | Pensioner साठी विशेष सुविधा! आता व्हिडिओ कॉलने जमा करू शकता लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Life Certificate | स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पेन्शनधारकांसाठी (Pensioner) 1 नोव्हेंबर 2021 पासून नवीन सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे आपले जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला (Life Certificate) जमा करू शकतात. एसबीआयने आपल्या या नवीन सुविधेला व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सर्व्हिस (SBI Video Life Certificate Service) नाव दिले आहे.

 

एसबीआयने म्हटले की, व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) सर्व्हिस सोपी, सुरक्षित, पेपरलेस आणि मोफत आहे. यामध्ये पेन्शनरला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पॅनकार्ड (PAN Card) ची गरज भासते.

 

ही आहे संपूर्ण प्रक्रिया –

 

  1. सर्वप्रथम https://www.pensionseva.sbi/ वर जा.
  2. यानंतर Video LC वर क्लिक करा.
  3. आता एसबीआय पेन्शन खाते क्रमांक लिहा.
  4. यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
  5. सर्व टर्म अँड कंडीशन्स लक्षपूर्वक वाचा आणि नंतर Start Journey वर क्लिक करा.
  6. नंतर पॅन कार्ड जवळ ठेवा आणि I am Ready वर क्लिक करा.
  7. यानंतर व्हिडिओ कॉल सुरू करण्याची परवानगी द्या.
  8. एसबीआय अधिकार्‍याच्या उपलब्धतेनुसार तुमचा व्हिडिओ कॉल सुरू होईल. याशिवाय सुविधेनुसार वेळेची निवड करू शकता.
  9. व्हिडिओ कॉल सुरू झाल्यानंतर अधिकारी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले चार डिजिट नंबर वाचायला सांगेल.
  10. पॅन कार्ड दाखवावे लागेल ज्याचा अधिकारी फोटो घेऊ शकेल.
  11. यानंतर तुमचा सुद्धा एक फोटो घेतला जाईल. नंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
  12. जर ही प्रक्रिया यशस्वी झाली नाही तर व्हिडिओ कॉलद्वारे माहिती दिली जाईल. अशावेळी पेन्शनधारकाला बँकेच्या शाखेत जाऊन जीवनप्रमाणत्र द्यावे लागेल. जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे आणि ती 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल.

 

पेन्शनर्सला येथे करावे लागेल रजिस्ट्रेशन

 

एसबीआयने पेन्शनर्ससाठी एक विशेष वेबसाइट सुद्धा बनवली आहे. या वेबसाइटमध्ये अगोदर पेन्शनरला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर सहजपणे लॉगइन करून याचा वापर केला जाऊ शकतो. ही वेबसाइट सीनियर सिटीजनची पेन्शनसंबंधी अनेक कामे सोपी करते. वेबसाइटद्वारे यूजर्स एरियर कॅलक्युलेशन शीट डाऊनलोड करू शकतात.

 

वेबसाइटद्वारे तुम्ही पेन्शन स्लिप किंवा फॉर्म-16 सुद्धा डाऊनलोड करू शकता. याशिवाय पेन्शन प्रोफाइल डिटेल, गुंतवणुकीची माहिती आणि लाईफ सर्टिफिकेटचे स्टेटस सुद्धा चेक करता येऊ शकते. बँकेत केलेल्या ट्रांजक्शनची माहिती सुद्धा याच वेबसाइटद्वारे मिळेल.

 

Web Title : Life Certificate | pensioners can submit life certificate through video calls sbi video life certificate service

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, माहेरच्या लोकांकडून सासू-साऱ्यांना बेदम मारहाण

Government Employees | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना मिळाली खुशखबर ! DA मध्ये करण्यात आली 9 % वाढ, जाणून घ्या कोणाला होणार ‘फायदा’

Indurikar Maharaj | ‘इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत कीर्तन होऊ देऊ नका’, शेतकरीपुत्राची CM ठाकरेंकडे मागणी