भोकर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हिमायतनगर येथील आरोपी बालाजी देवकते (वय ४३) याला भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सविस्तर माहिती अशी की, ८ वर्षीय मुलगी (दि.16) रोजी घरासमोर थांबलेल्या ऑटोमध्ये खेळत होती. त्यावेळी देवकते याने मुलीला आमिष दाखवून बाजूला नेऊन अत्याचार केला. आरोपी व फिर्यादी हे एकाच गल्लीत राहतात. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी दिसत नसल्याने शोधाशोध केली, पण मुलगी दिसून आली नाही. एका तासानंतर मुलगी घराकडे रडत आली. पीडित मुलीला विचारणा केली असता तिने बालाजी देवकते याने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यावरून फिर्यादी अशिया बी (वय ५० वर्ष, रा. हिमायतनगर ता.हिमायतनगर जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या व पीडित मुलीच्या जबाबावरून भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी आरोपीस बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तसेच १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यात सरकारी पक्षातर्फे ॲड. रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली. सदरील घटनेचा तपास तत्कालीन तपास अधिकारी डी. एस. काळे (PSI) यांनी केला, तर पैरवी अधिकारी म्हणून काकडे यांनी मदत केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/