काटेवाडी दुहेरी खून प्रकरणातील १० आरोपींना जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जमीनीच्या वादातून काटेवाडी येथे १२ मे २०१४ रोजी पहाटे दोघांचा मारहाण करुन खून करण्यात आला होता. या प्रकरणात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने या घटनेतील दहा आरोपींना गुरुवारी (दि.१०) जन्मठेपेची शिक्षा सुनावाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत देशपांडे यांनी ही शिक्षा सुनावली. सदर खटल्यामध्ये सरकारच्या वतीने अॅड. अनिल घोडके यांनी कामकाज पाहिले.

आसाराम यशवंत बहिर आणि त्यांचा मुलगा नितीन आसाराम बहिर असे खुन झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर महादेव गहिणीनाथ बहिर सुखदेव रहुनाथ बहिर, शहाजी रघुनाथ बहिर, मल्हारी कैलास बहिर, दादा किसन बहिर, राजेंद्र महादेव बहिर, रघुनाथ साहेबराव बहिर, कैलास तात्याबा बहिर, सोमनाथ उद्धव बहिर, संदिप गणपत बहिर (सर्व रा. काटेवाडी, ता. जामखेड, जि.नगर) अशी शिक्षा झाल्यांची नावे आहेत. यापैकी राजेंद्र बहिर, रघुनाथ बहिर, कैलास बहिर, सोमनाथ बहिर आणि संदिप बहीर यांना जन्मठेप आणि पधंरा हजार रुपांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास तीन वर्षांची साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. तर महादेव बहिर, सुखदेव बहिर, शहाजी बहिर, मल्हारी बहिर, दादा बहिर यांना हयात असेपर्य़ंत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पंधार हजार रुपयांचा दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास तीन वर्षांची साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींनी भरलेल्या दंडाच्या रक्कमेतील एक लाख रुपये मयत आसाराम बहिर यांची पत्नी गयाबाई बहिर यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अॅड. अनिल घोडके

घटनेची थोडक्यात हकिगत

मुख्य आरोपी महादेव बहिर आणि मयत आसाराम बहिर यांच्यामध्ये जमीनीचे वाद होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आरोपींनी मयत आसाराम यांना वेळोवेळी मारहाण करुन मारण्याची धमकी दिली जात होती. दरम्यानच्या काळात आसाराम यांचा मुलगा नितीन याचे लग्न असल्याने तो काठेवाडी येथे आला होता. घटनेच्या दिवशी आसाराम हे घरामध्ये झोपले होते तर नितीन बाहेर आंगणात झोपला होता. आरोपींनी पहाटे सहाच्या सुमरास आसाराम यांच्या घरात शिरुन त्यांना बाहेर ओढत आणून काठीने आणि गजाने मारहाण केली. त्यावेळी आरोपींना नितीन प्रात: विधीसाठी गेला असल्याचे समजले. आरोपींनी त्याला रस्त्यामध्ये आडवून बेदम मारहाण केली. या घटेनेमध्ये आसाराम आणि नितीन गंभीर जखमी झाले होते. तसेच नितीनला वाचवण्यासाठी आलेली त्याची आई हिला देखील मारहाण करण्यात आली होती.

या घटनेची माहिती जामखेड पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना नगर येथील रुग्णालयात घेऊन जाण्याचे डॉक्टरांक़डून सांगण्यात आले. त्यांना नगर येथे नेत असताना कड्याजवळ त्यांचा मृत्यू झाला.

जामखेड पोलिसांनी या घटनेत सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी कल्याण बहिर, फिर्य़ादी बापुसाहेब बहिर, सुरेश सपकाळे, पोलीस कॉन्टेबल भिंगारदिवे, बडे, संजय धिवर, अनिल देवकर, डॉ. संजय गुंडे पोलीस निरीक्षक संजय पाटील, डॉ. युवराज खाडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सर्वांच्या साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

सदरच्या खटल्यात सरकारच्या वतने अॅड. अनिल घोडके यांनी कामकाज पाहिले. तर पोलीस हेड कॉस्टेबल महेश जोशी यांची विशेष मदत झाली.