खून प्रकरणात झाली जन्मठेपेची शिक्षा, हायकोर्टाने जोडीदार शोधण्यासाठी दिली पॅरोलला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हायकोर्टाने खून प्रकरणातील एका दोषीला चार आठवड्यांच्या पॅरोलची मंजुरी दिली आहे, ज्याने जोडीदार शोधण्यासाठी चार आठवड्यांची सवलत मागितली होती. न्यायमूर्ती प्रतीक जालान यांनी आरोपीला ही सवलत दिली आहे, जो २००५ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. न्यायालयाने त्याला २५,००० रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर सवलत दिली आहे.

न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याचे (दोषी) समाजात कौटुंबिक संबंध आहेत आणि हे संबंध टिकवण्यासाठी त्याने पॅरोलची मागणी केली आहे. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याच्या सुटकेमुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे नुकसान होईल असे वाटत नाही.

न्यायालयाने जेल अधिकाऱ्यांना आदेश दिले की, याचिकाकर्ता व आरोपीची सुटका करताना आणि तो जेलमध्ये परत येण्याच्या वेळी लोकांनी आरोग्यविषयक सर्व खबरदारी घेतली जावी.

उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला पंजाबी बाग आणि सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे प्रभारी यांना त्याच्या मोबाइल फोन क्रमांकाबद्दल माहिती देण्याचे निर्देश दिले. त्यांच्याच क्षेत्रात याचिकाकर्त्याचे घर आहे. तसेच त्याला मोबाईल फोन नेहमी चालू ठेवण्यास सांगितले आहे.