पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – दारु पिऊन वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याप्रकरणी पत्नीला जिल्हा व सत्रन्यायाधीश विजय पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयश्री राजेंद्र बिरूनगे (वय २५, रा. मोही, खानापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना १८ सप्टेंबर २०१६ रोजी घडली होती.

जयश्री बिरूनगे हिचा राजेंद्र बिरूनगे यांच्याशी विवाह झाला होता. दोघेही खानापूर तालुक्यातील मोही येथे रामचंद्र शिवाजी जाधव यांच्या शेतात काम करीत होते. त्याच्यापूर्वी सुंदर ऊर्फ महेशकुमार सत्यवर सिंह व नीरजकुमार शर्मा हेदेखील जाधव यांच्याकडे कामाला होते. शेतात काम करीत असल्याने सुंदर आणि जयश्री यांचे अनैतिक संबंध जुळले होते. याची माहिती जयश्रीचे पती राजेंद्र यांना मिळाली होती. त्यामुळे राजेंद्र मद्य प्राशन करून तिला वारंवार मारहाण व शिवीगाळ करीत होते. ही बाब शेतमालक रामचंद्र जाधव यांना समजल्यानंतर त्यांनी सुंदर आणि नीरजकुमार यांना या घटनेपूर्वी दोन महिने आधी कामावरून काढून टाकले होते. तरीही राजेंद्र हे जयश्रीला वारंवार मारहाण करीत होते. त्यामुळे जयश्रीने कंटाळून सुंदर यास पतीचा खून करण्यास सांगितले होते.

सुरक्षा रक्षकाच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार

पनवेल : अल्पवयीन मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथे घडली आहे.

वॉचमनचे काम करणाऱ्या  व्यक्तीच्या तीन वर्षाच्या मुलाला त्याच भागातील रहिवाशी नीरज गुप्ता याने गोड बोलून चॉकलेटचे आमिष दाखवले व घरात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांना कळताच त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like